जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
तालुक्यातील आपटी येथिल नरसिंग विठोबा मत्रे (वय १०२) यांचे आज नगर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये दुखद निधन झाले. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व आपटीचे माजी सरपंच (मुकादम) युवराज मत्रे व श्री साकेश्वर विद्यालयातील सहशिक्षक महादेव मत्रे यांचे ते वडील होत.
त्यांच्या मागे पत्नी तिन मुले दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. नगर जिल्हाध्यक्ष महिला कुस्ती मल्लविद्या शिल्पा मत्रे यांचे ते आजोबा होत.
आपटी येथे रात्री नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.