जामखेड न्युज——
जिल्हा परिषद सारोळा शाळेचे सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत उत्तुंग यश!!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथील इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी शौर्य ब्रह्मदेव हजारे याने ऑल इंडिया सैनिकी स्कूल एंट्रास एक्झामीनेशन २०२४ मध्ये ३०० पैकी २६१ गुण संपादन करत उत्तुंग यश प्राप्त केले आहे.सदर परीक्षेतील सुयशाबद्दल शौर्य ब्रह्मदेव हजारे याचा सारोळा शाळेच्या वतीने आज गुरूवार, दि.१४ मार्च २०२४ रोजी यथोचित सन्मान करण्यात आला.
शौर्य हजारे या गुणवंत विद्यार्थ्यांला मुख्याध्यापक शहाजी जगताप, वर्गशिक्षक खंडेराव सोळंके, मार्गदर्शक शिक्षक माजिद शेख, राहुल लिमकर, प्रशांत होळकर, शबाना शेख व अमृता रसाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
शौर्य हजारे याने सैनिकी स्कूल स्पर्धा परीक्षेत केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल त्याचे व मार्गदर्शक सर्व शिक्षक वृंदांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
जामखेड पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर गटशिक्षणाधिकारी आदरणीय बाळासाहेब धनवे साहेब,जामखेड बीट शिक्षण विस्तार अधिकारी तथा राजुरी केंद्रप्रमुख सुरेश मोहिते तसेच सारोळा गावच्या सरपंच रितूताई काशिद,अजयदादा काशिद,उपसरपंच हर्षद मुळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर सातपुते,उपाध्यक्ष राजेंद्र आजबे,पालक व ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन करुन भविष्यातील उज्ज्वल शैक्षणिक वाटचाली करिता मनस्वी शुभेच्छा दिल्या.