जामखेड न्युज——
अखेर भास्कर सापडला, इंदापूर परिसरातून अटक
गेल्या दहा दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे याच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याच्यावर आर्थिक शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप आहे. विनयभंगाचा गुन्हा तसेच वन्य जीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. मोरे विरोधात आंदोलनाला जामखेड मधील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनीही पाठिंबा दिला. तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडूरंग भोसले हे उपोषण करत आहेत. काल तर जामखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले होते. काल आमदार रोहित पवार यांनी भेट दिली यानंतर आमदार प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली. तसेच काॅलेज तक्रारी बाबत मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा केली आणि उच्च स्तरीय चौकशी करण्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की आरोपीला इंदापूर भिगवण परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक केली आहे.

भास्कर मोरे याला अटक करण्यात आली आहे तरीही जोपर्यंत रत्नदीप मेडिकल फाउंडेशन वर कारवाई होत नाही आणि विद्यार्थ्यांचे इतर काॅलेज मध्ये समायोजन होत नाही व विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्स उपलब्ध करून दिला जात नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असलेल्याचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडूरंग भोसले यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

भास्कर मोरे कडून शारीरिक छळ होत असल्याचा विद्यार्थ्यीनीनी आरोप केल्यानंतर जामखेड पोलीस स्टेशनला डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला डॉ मोरे याला अखेरकार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदापूर भिगवण येथून उसाच्या शेतातून अटक केली आहे.

भास्कर मोरेला चोवीस तासात अटक करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले होते. पण नऊ दिवस झाले तरी अटक होत नाही यामुळे पोलीसांविरोधात तीव्र असंतोष होता. तेव्हा चोवीस नाही पण 224 तासात अटक करण्यात आली आहे.

रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत होती, फीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात होते त्याचप्रमाणे विद्यार्थिनींचा देखील शारीरिक छळ येथे केला जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला होता त्यानुसार विद्यार्थ्यांनी गेल्या दहा दिवसापासून आंदोलनाचा हत्यार उपसल होते.

विद्यार्थ्यांनी आंदोलनामुळे नाशिक, पुणे तसेच रायगड येथील विद्यापीठाच्या समितीने रत्नदीप मेडिकल कॉलेजला भेट दिली होती.यावेळी समितीला कॉलेजमध्ये भरपूर त्रुटी आढळून आल्यानंतर समितीने कॉलेजच्या सहा प्रयोगशाळांना देखील सील केले होते मात्र जोपर्यंत
कॉलेजची मान्यता रद्द होत नाही व डॉ भास्कर मोरे याला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होती.
दरम्यान विद्यार्थ्यां व उपोषणकर्त्यांचा रोष बघता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक पुणे, इंदापूर आणि यवत या भागामध्ये आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते. दरम्यान या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता अखेर डॉ. भास्कर मोरे हा इंदापूर येथील भिगवन या ठिकाणी असलेल्या एका उसाच्या शेतामध्ये आढळून आला असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. आहे.
तसेच रत्नदीप मेडिकल परिसरात काही वन्य जीव प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत त्याची चौकशी साठी ते नागपूर येथे प्रयोगशाळेत पाठवले आहेत त्यात मोरे दोषी आढळल्यास परत आणखी कडक गुन्हा दाखल होईल.






