जामखेड न्युज——–
समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम शिक्षकच – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षणाच्या चौथ्या टप्प्याचा समारोप
जामखेड तालुक्यात खुप चांगली गुणवत्ता आहे. काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देत त्याची माहिती समाजापर्यंत आणली यामुळे तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागली आहे. यामुळे आज तालुका गुणवत्तेत अग्रेसर आहे. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम शिक्षकच आहे असे मत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रमाचा तालुकास्तरीय उच्च माध्यमिकचा दुसरा टप्पा तर प्रशिक्षणाचा चौथ्या टप्प्याचा समारोप आज संपन्न झाला यावेळी समारोपाचे अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शोभा कांबळे, प्रा.रमेश चौधरी, प्रा.बाळासाहेब कोल्हे होते.
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे म्हणाले की, आतापर्यंत मी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या त्या ठिकाणी कामचुकार मोठ मोठ्या शिक्षक नेत्यांवर निलंबणाची कारवाई केली आहे. तसेच काम करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षक प्रमाणिक काम करतात प्रेरणा आवश्यक आहे. तीच दिली यामुळे गुणवत्ता वाढली. आपली खरी संपत्ती मुलेच हिच खरी संपत्ती आहे.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या शोभा कांबळे म्हणाल्या की, शिक्षक हा संवेदनशील असतो.शिक्षक मुलांना घडविण्याचे काम करतो. त्यामुळे आपण नशिबान आहोत. अधिकारी भौतिक सुविधेवर काम करतात. आपण सर्व माध्यमिक स्थरावर काम करतोत हे वय बाल्यावस्था व प्रौढावस्था यातील अवस्था आहे ही मानवी पुनर्जन्माची अवस्था आहे.शिक्षण क्षेत्रात महात्मा ज्योतिबा यांचे मोठे काम आहे. डॉ. बाळासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुळे आपण आज शिक्षण क्षेत्रात समानतेचे आपण सर्व विचाराने काम करत आहोत.
यावेळी बोलताना शोभा कांबळे म्हणाल्या की,
नवीन शैक्षणिक धोरणाची सुरूवात शिक्षकांनी आपल्यापासून करावी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी स्वत:ला नेहमी अपडेट करणे आवश्यक आहे. नववी ते बारावी हे फाउंडेशन आहे ते पक्के हवे आपण सकारात्मक विचार करून हे धोरण यशस्वी करून आपला विद्यार्थी जगाच्या बाजारपेठेत आदर्श नागरिक म्हणून कसा उभा राहिल हे पाहवे लागेल त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळे शिक्षक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक मूल शिकले पाहिजे, त्याचा सर्वागीण विकास झाला पाहिजे. यासाठी शिक्षकांनी नवनवीन विचारप्रवाह, विषयज्ञान, अध्यापनशास्त्र विविध धोरणे विषयी अद्ययावत असणे आवश्यक आहे.
शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्षामध्ये किमान पन्नास तासाचे प्रशिक्षण अपेक्षित आहे. शिक्षण व्यवस्थेत आता 10+2 ऐवजी 5+3+3+4 या सूत्रानुसार असणार आहे. शिक्षक होण्यासाठी आता बारावी नंतर चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संभाजीराव शेटे यांनी तर प्रशिक्षणाविषयी आपल्या तीन दिवसांच्या अनुभवाचे कथन प्रशिक्षणार्थी प्रा. रमेश चौधरी व प्रमिला पोळळे यांनी तर सुलभक म्हणून सुदाम वराट यांनी आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज भोसले तर
आभार प्रा. विकास जाधव यांनी मानले
यावेळी सुलभक म्हणून जिल्हा स्तरावर कोकमठाण येथे तीन दिवस प्रशिक्षण घेऊन आलेले सात सुलभक पुढील प्रमाणे होते. सुदाम वराट श्री साकेश्वर विद्यालय साकत, गोपाळ बाबर श्री नागेश विद्यालय जामखेड, सुभाष शितोळे एस सी एसटी शासकीय निवासी शाळा जामखेड, किशोर कुलकर्णी ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड,
मधुकर बोराटे जिजामाता माध्यमिक विद्यालय घोडेगाव, भिवा साबळे नंदादेवी विद्यालय नान्नज,
गणेश शिंदे खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा,
असे सात सुलभक होते.
तसेच प्रशिक्षण समन्वयक म्हणून जावेद शेख यांनी काम पाहिले.