Wednesday, February 11, 2026
Home शैक्षणिक बातम्या काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन दिल्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढली – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे...

काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन दिल्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढली – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे नवीन शैक्षणिक धोरण यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी स्वत:ला अपडेट करणे आवश्यक – उपप्राचार्य डॉ. सुनील नरके

0
530

जामखेड न्युज——

काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन दिल्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढली – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

नवीन शैक्षणिक धोरण यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी स्वत:ला अपडेट करणे आवश्यक – उपप्राचार्य डॉ. सुनील नरके

तालुक्यातील शिक्षकांमध्ये अनेक बाबी सकारात्मक आहेत त्या बाबींवर फोकस केला. त्या पुढे आणल्या यामुळे शिक्षकांनीही अंग झटकून काम केले यामुळे जामखेड तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे असे मत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रमाचा तालुकास्तरीय उच्च माध्यमिकचा पहिला टप्पा तर प्रशिक्षणाचा तिसरा टप्प्याचा समारोप आज संपन्न झाला यावेळी समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेड महाविद्यालय जामखेडचे उपप्राचार्य डॉ. सुनील नरके हे होते. यावेळी केंद्रप्रमुख केशव गायकवाड उपस्थित होते. 

यावेळी बोलताना उपप्राचार्य डॉ. नरके म्हणाले की,
नवीन शैक्षणिक धोरणाची सुरूवात शिक्षकांनी आपल्यापासून करावी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी स्वत:ला नेहमी अपडेट करणे आवश्यक आहे. नववी ते बारावी हे फाउंडेशन आहे ते पक्के हवे आपण सकारात्मक विचार करून हे धोरण यशस्वी करून आपला विद्यार्थी आपणास जगाच्या बाजारपेठेत आदर्श नागरिक म्हणून कसा उभा राहिल हे पाहवे लागेल त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी काँपी विष आहे. काँपी करून पास होणारा विद्यार्थी जगाच्या बाजारपेठेत टिकूच शकत नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करणे हिच खरी आपली जबाबदारी आहे.

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळे शिक्षक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक मूल शिकले पाहिजे, त्याचा सर्वागीण विकास झाला पाहिजे. यासाठी शिक्षकांनी नवनवीन विचारप्रवाह, विषयज्ञान, अध्यापनशास्त्र विविध धोरणे विषयी अद्ययावत असणे आवश्यक आहे.


शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्षामध्ये किमान पन्नास तासाचे प्रशिक्षण अपेक्षित आहे. शिक्षण व्यवस्थेत आता 10+2 ऐवजी 5+3+3+4 या सूत्रानुसार असणार आहे. शिक्षक होण्यासाठी आता बारावी नंतर चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

यावेळी प्रशिक्षणाविषयी आपल्या तीन दिवसांच्या अनुभवाचे कथन प्रशिक्षणार्थी प्रा. विधाते सर, प्रा. स्वाती साबळे, प्रा. गोसावी मँडम, प्रा. विनोद सासवडकर, प्रा. सिद्धेश्वर पवार यांनी केले तर सुलभक म्हणून सुदाम वराट व गोपाळ बाबर यांनी आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वाकळे प्रस्ताविक प्रा. कैलास वायकर तरआभार प्रा. आघाव यांनी केले.

यावेळी सुलभक म्हणून जिल्हा स्तरावर कोकमठाण येथे तीन दिवस प्रशिक्षण घेऊन आलेले सात सुलभक पुढील प्रमाणे होते.
सुदाम वराट श्री साकेश्वर विद्यालय साकत,
गोपाळ बाबर श्री नागेश विद्यालय जामखेड,
सुभाष शितोळे एस सी एसटी शासकीय निवासी शाळा जामखेड,
किशोर कुलकर्णी ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड,
मधुकर बोराटे जिजामाता माध्यमिक विद्यालय घोडेगाव,
भिवा साबळे नंदादेवी विद्यालय नान्नज,
गणेश शिंदे खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा,
असे सात सुलभक होते.

तसेच प्रशिक्षण समन्वयक म्हणून जावेद शेख यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!