गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या प्रयत्नामुळे जामखेड तालुक्यात भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात दहावी बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू

0
254

जामखेड न्युज——

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या प्रयत्नामुळे जामखेड तालुक्यात भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात दहावी बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू

 


जामखेड तालुक्यात कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पार पाडण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी शाळांना भेटी देत विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधत चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती केली होती याचाच परिणाम बारावी व दहावीच्या परीक्षा सुरळीत चालू आहेत.

जामखेड तालुक्यात दहावीच्या पाच केंद्रावर व बारावीच्या सहा परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा चालू असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी दिली.


जामखेड तालुक्यातील ल. ना . होशिंग विदयालय, नागेश विद्यालय, नंदादेवी विद्यालय नान्नज, खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा, सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी, अरणेश्वर अरणगाव आदि. ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत. सदर परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले असून दोन भरारी पथके परीक्षा केंद्रावर भेटी देत आहेत.

जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांनी चांगला पोलिस बंदोबस्त पुरविला आहे. तसेच खर्डा केंद्रावर नुकतेच हजर झालेले झांजड यांनी ही खर्डा परीक्षा केंद्रावर चांगला बंदोबस्त तैनात केला आहे. सर्व केंद्रसंचालक व पर्यवेक्षक हे चांगल्या प्रकारे परीक्षेचे कामकाज पहात आहेत.


विद्यार्थी यांनी आनंदी व उत्साही वातावरणात परीक्षा द्यावी असे अवाहन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यात प्रथमच परीक्षा शांततेत सुरू असल्याबद्दल पालक व विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here