माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास दिले लाख रुपयांचे बेंच, दादा लोंढे देणार स्टेज बांधून छत्रपती शिवाजी विद्यालयात वीस वर्षानंतर झालेल्या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा

0
631

जामखेड न्युज—–

माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास दिले लाख रुपयांचे बेंच, दादा लोंढे देणार स्टेज बांधून

छत्रपती शिवाजी विद्यालयात वीस वर्षानंतर झालेल्या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील एसएससी बॅच मार्च २००५ मधील विद्यार्थी – विद्यार्थिनींचा स्नेहसंमेलन कार्यक्रम शुक्रवार ११ जुलै रोजी पार पडला. एसएससी बॅच मार्च २००५ मधील ८० विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी सहभागी होते.

स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या माध्यमातुन सर्व मित्र – मैत्रिणी 20 वर्षानंतर एकत्र आले होते.जून्या – नव्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या सूख – दुःखात पुढील काळात मदत करणे व सहभागी होण्याचे सर्वांनी ठरवले.तसेच ज्या शाळेने आपणाला घडवले व जून्या आठवणी दिल्या त्या शाळेला वस्तू रुपी भरीव मदत स्वरुपात १ लाख रुपये किमतीचे ३० बेंच भेट देण्यात आले.ssc बॅचच्या वतीने भावी पिढीला शैक्षणिक संधी मिळतील हा या ग्रुपचा व स्नेह संमेलन कार्यक्रमाचा उद्देश होता.

शाळेत सकाळी ११ वाजता सर्वजण जमले. बरोबर ११ वाजता शाळेची घंटा वाजल्यावर परिपाठ घेण्यात आला. माजी मुख्याध्यापक श्री. सदाफुले सर यांनी परिपाठ घेतला. स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री शहाजी पाटील, सदस्य दत्तात्रेय हजारे आण्णा, गौतम मते तसेच विद्यालयाचे सध्याचे प्राचार्य श्री जोरे सर उपस्थित होते.

या स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी नाष्टा, जेवण याची पूर्ण सोय युवा उद्योजक मा. विकी शेठ मंडलेचा यांनी केली. तसेच सत्कार व शुभेच्छा खर्चाचा पूर्ण भार युवा उद्योजक मा. अनिल शेठ मते उचलला. Ssc २००५ बॅच मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीनी सर्वांनी मिळून १ लाख रुपये किमतीचे ३० बेंच शाळेला भेट दिले. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे या बॅच मधील विद्यार्थी मा. दादा नामदेव लोंढे यांनी स्टेज बांधून देण्याचे घोषित केले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली.कार्यक्रम सुरू झाल्यावर विद्यार्थी परिचय, उद्योग, शिक्षण यावर चर्चा झाली. सूत्रसंचालन शिक्षक मा. संतोष सरसमकर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार सौ. रसिका वाळके यांनी मानले.

सर्वांनी स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here