जामखेड न्युज——
आमदार निलेश लंके जनतेच्या गळ्यातील ताईत -आमदार प्रा. राम शिंदे
लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिवपुत्र संभाजी महानाट्यासाठी प्रचंड गर्दी
आमदार निलेश लंके हे जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत त्यांच्या प्रेमाखातर महानाट्यासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे. यामुळे येणारा काळ आपलाच आहे. जनतेसाठी तुम्ही संघर्ष केलेला आहे यामुळे जनतेचे प्रेम आपल्यावर आहे हे दिसून येत आहे असे मत आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणारे
डॉ. अमोल कोल्हे यांची भुमिका असणारे ऐतिहासिक महानाट्य शिवपुत्र संभाजी 1 मार्च पासून अहमदनगर शहरातील केडगाव येथे प्रचंड गर्दीत सुरू आहे. यावेळी आमदार प्रा. शिंदे बोलत होते.
- यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, आमदार निलेश लंके, माजी आमदार चंद्रशेखर कदम पाटील, घनश्याम शेलार, राजेंद्र फाळके, प्रा. मधुकर राळेभात, बाळासाहेब सांळुके, राणीताई लंके, प्रा. लक्ष्मण ढेपे, युवराज पाटील यांच्या सह अनेक सर्वपक्षीय मान्यवर तसेच प्रचंड जनसमुदाय नाटक पाहण्यासाठी उपस्थित होता. गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शहरातील सक्कर चौकापासून वाहतूक कोंडी होती. नाटक पाहण्यासाठी मैदानावर लोक बसत नाहीत हे पाहून कनात सोडावी लागली.
डॉ. अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत होते. त्यांची शब्द फेक, चित्तथरारक घोडेस्वारी, नाटकातील लढाई, बैलगाड्या, 26 फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम असे सर्वच चित्तथरारक प्रसंग दाखविण्यात आले. लोकांना बसण्यासाठी जागा नाही हे पाहून कनात सोडावी लागली.
निलेश लंके नावाच्या तरुणाचा कामगार ते आमदार पर्यंतचा प्रवास संघर्षमय आहे. कोरोना काळात देवदूत म्हणून आमदार लंके यांनी काम केले आहे.
पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या सकल्पनेतून आ. निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने नगरच्या नेमाने इस्टेट येथे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य दि. 1 ते 4 तारखेपर्यंत आहे. या महानाट्यासाठी दररोज साठ हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली होती तीही कमी पडली.
महानाट्यासाठी 150 फूट किल्ल्याचा रंगमंच असून खरी खुरी लढाई हत्ती, घोडे, बैलगाड्या, 26 फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंग मंच म्हणून वापर करण्यात येत आहे.
महानाट्यामध्ये डॉ.अमोल कोल्हे यांची मैदानातून चित्तथरार घोडेस्वारी पाहण्यास मिळाली महानाट्यासाठी 150 फूट लांब 80 फूट रुंद व पाच मजली किल्ल्याचा हुबेहूब प्रतिकृतीचा 67 लाख रुपये खर्चाचा सेट आहे. महानट्यासाठी वीस लाख रुपयाची राजे शाही ड्रेपरी चार लाखांचे शास्त्रास्त्रे आणि युद्ध साहित्य वापरण्यात येत आहे.