शैक्षणिक गुणवत्तेत जिल्हा परिषद माळीवस्ती शाळा नेहमीच अग्रेसर असते. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत अनेक विद्यार्थी चमकत असतात. शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवस्ती(शिऊर), केंद्र-नायगाव, तालुका-जामखेड शाळेतील विद्यार्थी सारंग प्रदीप झुंजरूक राज्य गुणवत्तायादीत आली आहे.
तर जिल्हा गुणवत्ता यादीत श्रेया बळी जायभाय, वेदांत गणेश नेटके, भक्ती भरत काळे या तीन विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले.
शाळेचा शिष्यवृत्ती निकाल 100 % लागला आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री निंबाळकर सर व वर्गशिक्षिका श्रीम. पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील सर्व पालक, नायगाव केंद्रातील सर्व शिक्षक, नायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश मोहिते, विस्तार अधिकारी जालिंदर खताळ ,
गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, गटविकास अधिकारी शुभम जाधव या सर्वांनी अभिनंदन केले आहे.