जामखेड न्युज——
संभाजीराव भिडे गुरुजींची गाडी अडविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी – जामखेड शिवप्रतिष्ठानची मागणी
गुरुवर्य श्री. संभाजीराव विनायकराव भिडे (गुरुजी) हे श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान या संघटनेचे संस्थापक आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांमध्ये, उगवती तरुण पिढी ही पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना आदर्श मानुन जगावी, ही पिढी तत्वनिष्ठ, धर्मनिष्ठ बनावी या ध्येयासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. त्यांची काही पळपुट्या, विचारशून्य जमावाने गुरुजींविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेचा जामखेड शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानने पांडुरंग भोसले यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
हिंदूंमध्ये हिंदुत्वाची चेतना जागृत करण्यासाठी गुरुजी श्री दुर्गामाता दौड, गडकोट मोहीम, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास इ. उपक्रम दरवर्षी राबवत असतात, तसेच दररोज अनेक ठिकाणी सभा बैठकींसाठी सांगली मधून ये-जा करत असतात, त्यांचे विचार हे अत्यंत अभ्यासपूर्ण, स्पष्ट, परखड व रोख-ठोक असतात. गुरुजींच्या त्यागपूर्ण वागण्यामुळेच महाराष्ट्रातच नव्हेतर महाराष्ट्राबाहेरील परराज्यात सुध्दा त्यांना गुरु मानून लाखो धारकरी श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान या संघटनेमध्ये कोणताही जातीपाती न मानता कार्य करत आहेत. यामुळे गुरुजींचे समाजात एक आदराचे स्थान आहे.
हिंदूत्ववादी विचार म्हणजे जातीयवादी विचार मानणाऱ्या अनेक व्यक्ती, संघटना त्यांना विरोधाला विरोध करत असतात. गुरुजींचे विचार पुर्णपणे जाणून न घेता, त्वरीत त्यांच्या विचारांवर विरोधी मतप्रदर्शन करीत असतात. आदरणीय श्री. भिडे गुरुजी हे अशा कोणत्याही टिकेला, विरोधाला न जुमानता आपल्या ध्येयपूर्ततेसाठी मार्गक्रमण करत असतात. पण काही समाजकंटकांना श्री. भिडे गुरुजी हे पूर्णपणे न कळल्यामुळे, गुरुजींचे वाढणारे श्री. शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे कार्य सतत बोचत राहते.
दिनांक २९/०२/२०२४ रोजी रात्रीच्या सुमारास गुरुजी जेंव्हा नाशिक जिल्हयातील मनमाड येथील नियोजित कार्यक्रम संपवून धुळे येथे जात असताना काही पळपुट्या, विचारशून्य, स्टंटबाजी करणाऱ्या जमावाने गुरुजींविरोधात घोषणाबाजी केली व त्यांच्या गाडीला आडवे येवून घोषणाबाजी करुन, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. परंतु ह्या पळपुटया विचारशून्य टोळक्यांचा आम्ही श्री. शिवप्रतिष्ठानचे धारकरी जाहीर निषेध करतो, परंतू हा सर्व प्रकार पाहता गाडीच्या आडवा येणारा जमाव हा पुर्वनियोजित कट होता, तसेच आदरणीय गुरुजींच्यावर हल्ला करण्याचा कपटी डाव होता असे दिसून येते.
त्यामुळे संबंधीत स्टटंबाजी करणाऱ्या जमावावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही समाज कंटकाकडून अनुचीत कृत्य घडू नये या कारणास्तव आदरणीय गुरुवर्य श्री. संभाजीराव विनायकराव भिडे (गुरुजी) यांना महाराष्ट्र राज्यात व राज्याबाहेर कायमस्वरूपी विशेष सुरक्षा व्यवस्था मिळावी, ही विनंती असे निवेदन देण्यात आले.
सदर प्रसंगी जामखेड शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख पांडुराजे भोसले, बाळासाहेब ढाळे, सचिन देशमुख ,अक्षय घागरे,जगु म्हेत्रे,भाऊ पोटफोडे,नाना खंडागळे,किरण राऊत,दादा महाडीक,विजय कुलकर्णी,उमेश राळेभात, बुवासाहेब जगदाळे, बालाजी मराळ, विशाल पठाडे,अमोल पाचंग्रे, आदीत्य थोरात,शैलेश गिरी,श्रीधर सिध्देश्वर, मल्हारी सगळे,सावता मोहळकर,अभिजीत निंबाळकर, ऋषीकेश डोके, पोटफोडे सर यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.