जामखेड न्युज——
प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटाला खिंडार
शिक्षक नेते माजी चेअरमन, सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिक्षक संघात प्रवेश

शिक्षक नेते, शिक्षक बँक माजी चेअरमन तसेच सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत तसेच
जामखेड तालुका महिला आघाडी तालुका अध्यक्ष
अर्चना भोसले यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवाजीराव पाटील गटाला सोडचिठ्ठी देत संभाजीराव थोरात यांच्या शिक्षक संघात प्रवेश केला आहे. यामुळे शिक्षकांच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

नारायण राऊत, जामखेड तालुका महिला आघाडी तालुकाध्यक्ष अर्चना भोसले यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघात अहमदनगर कल्याण रोडवर द्वारका लॉन येथे अहमदनगर प्राथमिक शिक्षकाचे महामंडळ अधिवेशन शिक्षक संघाचे नेते आदरणीय संभाजी (तात्या) थोरात, उपनेते रावसाहेब रोहकले, राज्य संपर्कप्रमुख संजय कळमकर, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके, रावसाहेब सुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २४ फेब्रुवारी रोजी पार पडले.

अधिवेशनात शिक्षकाच्या प्रलंबीत प्रश्नावर चर्चा होऊन अनेक निर्णय घेण्यात आले.या महामंडळ अधिवेशनात जामखेड तालुक्यातुन 150 शिक्षकांनी उपस्थिती दाखवुन शिक्षक संघावरचा विश्वास सार्थ केला.

जामखेड तालुक्यातील शिक्षक नेते नारायण राऊत
महिला आघाडी तालुका अध्यक्षा अर्चना भोसले
यांच्या नेतृत्वाखाली मंजीरी गाढवे, रामचंद्र गाढवे
उपेंद्र आढाव, पारखे मल्हारी, तसेच इतर असंख्य
कार्यकर्त्यांनी शिक्षक संघाचे नेते आदरणीय
संभाजी (तात्या) थोरात, उपनेते रावसाहेब रोहकले,
राज्य संपर्कप्रमुख संजय कळमकर, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके, रावसाहेब सुंबे सह अनेक शिक्षक नेते उपस्थित होते.
. 
तसेच जामखेड तालुक्यातील शिक्षक नेते राम निकम, किसनराव वराट, उत्तम पवार, विजयकुमार जाधव, नारायण लहाने, हनुमंत निंबाळकर, दत्तात्रय यादव, अशोक घोडेस्वार शिल्पा साखरे, जामखेड तालुकाध्यक्ष नानासाहेब मोरे, यांच्या उपस्थितीत प्रवेश करून संघाची ताकद वाढविली आहे.

प्रवेश केलेल्या सर्व शिक्षक नेत्यांचे अभिनंदन केले आहे.



