जामखेडमध्ये आता सर्व शेती औजारे मिळणार एकाच छताखाली, डी. बी. मशिनरी म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रगतीतील साथीदार

0
945

जामखेड न्युज——

जामखेडमध्ये आता सर्व शेती औजारे मिळणार एकाच छताखाली,

डी. बी. मशिनरी म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रगतीतील साथीदार

परिसरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे आता शेतीशी संबंधित सर्व अत्याधुनिक औजारे डी.बी. मशिनरी या दुकानात मिळणार आहेत. डी. बी. मशिनरी म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रगतीतील खरा साथीदार असणार आहे. तरी या दुकानाच्या शुभारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिलीप शेठ पवार व आनंद पाचपुते यांनी केले आहे.

सहारा हाँटेल शेजारी नगर रोडवर बुधवार दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पांडुरंग शास्त्री देशमुख यांच्या शुभहस्ते व आपणा सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

मुरघास कट्टी मशीन, सायलेंस पँकिंग, पाँवर विडर, आर्मेचर, जनरेटर, दुध मशिन, ऊस पाचट कुट्टी, सर्व प्रकारचे पेरणी यंत्र, रोटावेटर, स्टार टोकरी, पाँप्युलर
नांगर, वाफा यंत्र, सर्व प्रकारचे मळणीयंत्र यासह अनेक अत्याधुनिक शेती औजारे आता डी. बी. पवार या दुकानात एकाच छताखाली मिळणार आहेत.


शक्ती किसान ऊस पाचट कुट्टी

एक हेक्टर क्षेत्रामधून सुमारे 10 ते 12
टन वाळलेले पाचट मिळते. हे पाचट न जाळता ते
कुजवल्यास सहा ते सात टन सेंद्रिय खत मिळते.
यामुळे जमिनीची सुपीकता सातत्याने वाढते.

पाचट तंत्रज्ञानामुळे जमिनीची सुपीकता तीन ते
चार वर्षे टिकून राहील तितकेच खोडव्याचे पीकही
सातत्याने घेता येईल. यामुळे बेणे, मशागत व मजुरी
खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल.

जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच सेंद्रिय खताची उपलब्धता वाढते. त्यामुळे जीवाणू वा गांडुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. दिलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून ते पिकास उपलब्ध होतात. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते.

 

वेगवेगळ्या साईजमध्ये पेरणीयंत्र

 

सर्व प्रकारचे बियाण्याची प्रेरणी करण्यासाठी
वेगवेगळे साईजमध्ये पेरणी यंत्र उपलब्ध
अनुदान तत्वावर केळी लागवड मध्ये प्रेरणी
करण्यासाठी स्पेशल पेरणी यंत्र
• भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, गहू,
ज्वारी, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने
पेरणी करता येते.

• दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार योग्य
खोलीवर आणि बियाण्याच्या बाजूला देता येते.

• बियाण्याच्या पेट्या स्वतंत्र असल्यामुळे
आंतरपिकांची टोकणसुद्धा करता येते.

• या यंत्राद्वारा दोन ओळींतील अंतर 22.5 सें. मी., 30 सें. मी. आणि 45 सें. मी. राखता येते.
एका दिवसात जवळजवळ 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्रावर
टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

मिल्किंग मशीन

 

मिल्किंग मशीन मुळे जनावरांच्या कासेला इजा होत नाही. दुधाची गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते.

यामुळे कमी खर्च कमी होतो अन् वेळही वाचतो.
दुधात कोणत्याही प्रकारची घाण येत नाही.
मिल्किंग मशीनमुळे दुधाचे प्रमाण 10 ते 20 टक्क्यांनी वाढते. मिल्किंग मशीन वापरुँन स्वच्छ आणि उच्च दर्जाचे दूध मिळते. दूध काढण्याच्या यंत्रांमुळे पशुपालक मालकांचा बरीच वेळ वाचतो.

याचबरोबर वाफा खाचे यंत्र, चारा कापणी मशीन, पाँप्युलर नांगर, मळणीयंत्र थ्रेशर, बीएसी पावर विडर अशा अनेक अत्याधुनिक शेती अवजारांची उपलब्धता आता एकाच छताखाली होणार आहे. या दुकानाचा शुभारंभ सहारा हाँटेल शेजारी नगर रोडवर बुधवार दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पांडुरंग शास्त्री देशमुख यांच्या शुभहस्ते व आपणा सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिलीप शेठ पवार व आनंद पाचपुते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here