आरोपींचा जामखेड पोलिसांच्या जीपवर हल्ला, तीन पोलिसांना मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल!!!

0
2379

जामखेड न्युज——

आरोपींचा जामखेड पोलिसांच्या जीपवर हल्ला, तीन पोलिसांना मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल!!!

 

केज तालुक्यातील लव्हुरी येथील फरार आरोपीला घेऊन निघालेल्या जामखेड पोलिसांच्या खासगी वाहनावर हल्ला चढवत संशयितांनी तीन पोलिसांना मारहाण करत वाहनाच्या काचाही फोडल्या. ही घटना केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजता घडली यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर काही अरोपी.जामखेड पोलिसांच्या रेकॉर्डवरील फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आरोपी प्रतीक भैरवनाथ चाळक (रा. लव्हुरी, ता. केज) याच्या शोधासाठी जामखेड पोलिसांचे चार जणांचे पथक खासगी जीपने (एमएच १६ सीव्ही ५५५५) गेले होते. मध्यरात्री १ वाजता केज पोलिस ठाण्यातून पथकाने मदत मागितली.


केजचे सहायक फौजदार आर. बी. वाघमारे हे पथकासोबत मदतीसाठी गेले. पथक लव्हुरी गावातील बसस्थानकाजवळ पोहोचले होते. या वेळी २० ते २५ जण दुसऱ्या जीपच्या (एमएच ४४ झेड २३००) बोनेटवर केक ठेवून वाढदिवस साजरा करत होते. त्याच जमावामध्ये आरोपी प्रतीक चाळक पोलिसांना दिसला.


पथकाने लागलीच त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस आरोपीला घेऊन कानडीमार्गे केज पोलिस ठाण्याकडे निघाले. दोन किलोमीटर अंतरावर आल्यानंतर पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करत संशयितांनी जीप आडवी लावली आणि पथकाला थांबवल्यानंतर जीपची काच फोडली.

चालकाने जीप मागे घेतली अन् पोलिस ठाण्यात आणली संशयितांनी जमादार प्रवीण इंगळे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर बेल्हेकर व शिपाई कुलदीप घोळवे यांना मारहाण केली. आरोपी प्रतीक चाळक याला जीपबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत जीप मागे घेत तत्काळ पोलिस ठाण्यात आणली.

आरोपीकडून पोलिसांनी संशयितांची नावे जाणून घेतली. वाहनावर दगडफेक करणाऱ्यांत अभिषेक सावंत, ईश्वर चाळक, राहुल चाळक, सौरभ चाळक, रोहित चाळक, मुन्ना बचाटे (सर्व रा. लव्हुरी) व तीन अनोळखी अशा ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे तसेच अरोपी प्रतीक भैरवनाथ चाळक यास जामखेड न्यायालय येथे हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तसेच पुढील तपास पोलीस हवादार प्रवीण इंगळे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here