जामखेड न्युज——
अदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार – लक्ष्मी पवार
आदिवासी प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांच्याशी आदिवासींच्या प्रश्नांसाठी चर्चा
अदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय योजना तळागाळातील लोकापर्यंत पोहचवण्यासाठी माझी अहोरात्र कष्ट करण्याची तयारी आहे. अदिवासीच्या वेगवेगळ्या योजनांविषयी आदिवासी प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांची भेट घेत सविस्तर चर्चा करत सर्व योजनांविषयी माहिती घेतली असल्याची माहिती जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी दिली.
जनविकास सेवाभावी संस्था ही गेली आनेक वर्षे आदिवासी भटके यांच्यासह दिन दुबळ्या उपेक्षित समाजाच्या हितासाठी काम करत आहे तसेच महिलांसाठी संस्थेच्या वतीने आनेक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत याच संदर्भात आदिवासी भटक्यांच्या शासकीय योजनांची माहिती घेऊन योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष लक्ष्मी पवार यांनी राजुर ता. अकोले येथील आदिवासी विकास प्रकल्पास भेट दिली व या प्रकल्पाचे अधिकारी राजन पाटील यांच्या समवेत योजनांबाबत चर्चा केली.
राजुर येथील प्रकल्पामध्ये आदिवासींच्या साठीच्या योजना अत्यंत प्रभावीपणे राबविल्या जातात यामुळे हा भटका समाज समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे.राजुर हे नगर जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे तसेच जामखेड तालुकाही नगर दक्षिणेच्या अंतिम टोकाला आहे नेहमी दुष्काळी तालुका अशी तालुक्याची ओळख शासनस्तरावरील योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रकल्पाचे अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली व जामखेड तालुक्यातील या बांधवांसाठी सक्षमपणे योजना राबवु अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी चर्चा दरम्यान दिली.
यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार म्हणाल्या की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरीही आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात तालुक्यातील आदिवासी भटका समाज आजही रानावनात आपली उपजिवीका करत आहे त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमची संस्था जनजागृती करत आहे.
आदिवासी भटक्या समाजातील शिक्षणाची कास धरावी आपले मुलं शिकली पाहिजेत ती शिकुन सज्ञान झाली तर आपल्या न्याय हक्कासाठी ते प्रयत्न करतील व समजण्याच्या मुख्य प्रवाहात येतील.
संगत गुणाने व चांगल्या मार्गदर्शनाने माणुस घडतो व माणुस म्हणुन जगु लागतो अशी कितीतरी उदाहरणे हे समाजकार्य करताना जाणुन आली आहेत. त्यामुळे आपली पुढची पिढी नक्कीच प्रगत होईल आणि हेच उद्दिष्ट घेऊन संस्था काम करत आहे.
यावेळी प्रक्लप अधिकारी राजन पाटील संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार,अदिवासी प्रकल्पाचे श्री जाधव, सरोदे, जाधव मॅडम, शिंदे यांच्या सह जनविकास सेवाभावी संस्थेचे संतोष पिंपळे, अलका पिंपळे, वैशाली शिंदे यांच्यासह आनेक मान्यवर उपस्थित होते.