आमदार रोहित पवारांनी भोगलवाडी सभामंडपाचे आश्वासन केले पुर्ण ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शिखर तर माता भगिनींनी कलशाची उभारणी, सुनंदाताई पवार यांच्या हस्ते लोकार्पण

0
149

जामखेड न्युज—–

आमदार रोहित पवारांनी भोगलवाडी सभामंडपाचे आश्वासन केले पुर्ण

ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शिखर तर माता भगिनींनी कलशाची उभारणी, सुनंदाताई पवार यांच्या हस्ते लोकार्पण

विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी कुसडगावतंर्गत असलेल्या भोगलवाडी येथील विठ्ठल मंदिर सभामंडपाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते नऊ महिन्यात भव्य दिव्य असा सभामंडपाचे काम पूर्ण करून आश्वासन पाळले व गावातील गावकर्यांनी शिखराचे काम केले तर महिला भगिनींनीच्या वतीने वर्गणीतून मंदिराचा कळस उभारणी केली या कामाचे लोकार्पण सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गावकरी, महिला, पुढारी एकत्र आल्यास गावाचा कायापालट होऊ शकतो यांचे उत्तम उदाहरण झाले आहे यावेळी गावातील लाडक्या बहिणींचा सत्कार करण्यात आला

तालुक्यातील कुसडगाव येथील भोगलवाडी येथे श्रावण महीन्यात विठ्ठल मंदिर याठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह असतो. मागिल वर्षी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे कीर्तनास येणाऱ्या भाविकांचे सभामंडप नसल्याने प्रचंड हाल झाले होते.

पावसामुळे भाविकांना प्रसादही घेता आला नव्हता यावेळी गावातील भाजपाच्या काही पुढार्यांनी पुढील वर्षी सभामंडप उभारू असे आश्वासन दिले होते मात्र भाजप पदाधिकारी यांच्या कडून शब्द पाळण्यात आला नाही.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व आ. रोहीत पवार यांचे खंदे समर्थक माजी सरपंच बापुसाहेब कार्ले व गावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन मंदिराला सभामंडप मिळावा यासाठी आ. रोहीत पवार यांच्याकडे मागणी केली होती.आमदार रोहित पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता सभामंडप उभारणीसाठी निधी देऊन बापूसाहेब कार्ले यांचा शब्दाला ताकद दिली.

 

त्यानंतर अवघ्या नऊ महिन्यातच मंदिरात सभामंडप उभारण्यात आला या मंदिराच्या शिखरासाठी गावाऱ्यानी आर्थिक मदत केली तर गावातील लाडक्या बहिणींनी यासाठी पुढाकार घेऊन मंदिराच्या कळस उभारणी केली या कामाचा लोकार्पण सोहळा आ. रोहीत पवार यांच्या मातोश्री सौ. सुनंदाताई पवार व हभप कैलास महाराज भोरे
यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी आ. रोहीत पवार यांचे खंदे समर्थक व माजी सरपंच बापुसाहेब कार्ले ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधकांचे आश्वासन हवेत गेले

गेल्या वर्षी भर पावसात हरिनाम सप्ताह दरम्यान सभामंडप नसल्याने महिलांचे हाल झाले होते. यावेळी गावातील पुढारी महाशयांनी सभामंडप उभारू असे आश्वासन दिले होते मात्र आश्वासन पाळण्यात आले नाही. यांची दाखल घेऊन आमदार रोहित पवार यांनी सभामंडप उभारण्याचे आश्वासन दिले आणि नऊच महिन्यात भव्य दिव्य सभामंडप उभारला याबद्दल गावकर्यांनी आ पवारांचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here