जामखेड शहरासह तालुक्यात एकाच दिवशी सहा अवैध दारू विक्री हाॅटेल वर कारवाई, हजारो रूपयांचा मुद्देमाल जप्त

0
1734

जामखेड न्युज—–

जामखेड शहरासह तालुक्यात एकाच दिवशी सहा अवैध दारू विक्री हाॅटेल वर कारवाई, हजारो रूपयांचा मुद्देमाल जप्त

जामखेड शहरासह तालुक्यात गुरूवार दि. ०३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व जामखेड पोलीसांनी एकाच वेळी अवैध दारू विक्री करणाऱ्या हाॅटेल वर कारवाई करत सुमारे १८४४५ रूपयांची देशी विदेशी दारू बाटल्या सीलबंद बाटल्या जप्त करत सहा हाॅटेल चालकांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीसांनी एकाच वेळी कारवाई करत शहरासह तालुक्यात सहा अवैध दारू करणाऱ्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

जामखेड शहरातील कर्जत रोडवरील जाधव मळा येथील हाॅटेल सुगरण वर कारवाई करत 3150 रूपये किंमतीच्या देशी, बाँबी, संत्रा दारू 45 सीलबंद बाटल्या तसेच 180 मीली च्या 70 रूपये प्रत्येकी बाटल्या आढळून आल्या पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादी नुसार चंद्रकांत आसंगे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर एन वाघ करत आहेत.

शहरातील बीड रोडवरील हाॅटेल निलकमल येथे छापा टाकत 1810 रूपये किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर चे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अमोल बाजीराव खरात वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्यामसुंदर जाधव करत आहेत.

जामखेड शहरातील बीड रोडवरील हाॅटेल शिवराज येथे छापा टाकत 1455 रूपये किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर चे पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून बंडू दगडू डांगरे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.पी.पालवे करत आहेत.

शहरासह तालुक्यातील नान्नज येथे हाॅटेल सुयोग वर छापा टाकला तेव्हा तेथे 3560 रूपये किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या तेव्हा स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर चे पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे यानी दिलेल्या फिर्यादी वरून सागर भरत शितोळे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. डी. लोखंडे करत आहेत.

तालुक्यातील नान्नज येथील हाॅटेल मित्रप्रेम येथे छापा टाकत 2995 रूपये किंमतीच्या देशी, विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर चे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दत्ता शरद उर्फ दादा भोसले यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. डी. लोखंडे करत आहेत.

तालुक्यातील पिंपरखेड येथील हाॅटेल अनन्या येथे छापा टाकत 5475 रूपये किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर चे पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम संतोष भापकर यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. डी. लोखंडे करत आहेत.

अशा प्रकारे शहरासह तालुक्यात सहा ठिकाणी एकाच वेळी अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करत मोठ्या रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here