जामखेड न्युज——
जामखेड रेणुकामाता मल्टिस्टेटच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात “मराठी पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो सामाजिक बांधिलकी जपत जामखेड रेणुकामाता मल्टिस्टेटच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

रेणुकामाता मल्टिस्टेटचे मुख्य प्रवर्तक अर्थतज्ज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे आर्थिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे तसेच सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

यावेळी शाखाधिकारी अमोल खंदारे, लिपिक अंगद सरोदे, नसरीन शेख, कर्डुले अतुल, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण घोलप, दत्तात्रय राऊत, फाय्यभाई सय्यद, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, सचिव सत्तार शेख, सहसचिव पप्पूभाई सय्यद, अविनाश बोधले, किरण रेडे, मोहिद्दीन तांबोळी, लियाकत शेख, शिवाजी इकडे, संतोष गर्जे, अजय अवसरे यांच्या सह मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.

जामखेड रेणुकामाता मल्टिस्टेट शाखेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी आज दि.6जानेवारी 2024 रोजी जामखेड शहरातील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी जि.अहमदनगर यांच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.






