तरूण पिढी देशाची अमूल्य संपत्ती – पोलीस निरीक्षक महेश पाटील ल. ना. होशिंग विद्यालयात पोलीस रायझिंग डे सप्ताह साजरा

0
438

जामखेड न्युज—————

तरूण पिढी देशाची अमूल्य संपत्ती – पोलीस निरीक्षक महेश पाटील

ल. ना. होशिंग विद्यालयात पोलीस रायझिंग डे सप्ताह साजरा

 

 

विद्यार्थ्यांना जीवनातील यशाचे गमकासाठी योग्य व्यायाम,अभ्यास व योग्य संस्कार हेच महत्त्वाचे तीन घटक आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमीत कमी करून स्वतःवरच लक्ष जास्त केंद्रित करावे व त्रिसूत्रीचा वापर करून आदर्श नागरिक तयार व्हावेत यासाठीच आई-वडील, शिक्षक,समाज शिकवण देत असतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पोलिस दलातील विविध संधी त्याचप्रमाणे भावी आदर्श नागरिक निर्माण होत असताना त्यांना आहार व शारीरिक स्वच्छता आणि रस्ते नियम इत्यादी बद्दल विद्यार्थ्यांना अतिशय सखोल असे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.

ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी पोलीस रायझिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे होते.प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड पोलीस स्टेशनचे पीआय महेश एनसीसी व प्रमुख अनिल देडे कला शिक्षक राऊत मुकुंद,विशाल पोले,नरेंद्र डहाळे,व पोलीस बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पी आय महेश पाटील साहेब यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे व सर्वांचे हस्ते करण्यात आला.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थी सद्यस्थितीत मोबाईल, व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादीपासून सावधगिरी कशी बाळगावी, मोबाईलच्या आहारी न जाता एक प्रभावी साधन म्हणून मोबाईलचा योग्य वापर कसा करावा,सायबर गुन्हे कसे घडतात इत्यादी बद्दल विस्तृत माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनात योग्य गुणांची जागृती निर्माण करून स्वतःची व इतरांची सुरक्षा कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन आपले मनोगत पूर्ण केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पारखे साहेब यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस बांधवांना पोलीस रायझिंग डे निमित्त शुभेच्छा दिल्या. पोलीस दल हे जनतेचा कणा असून अंतर्गत शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलीस बांधव नेहमीच तत्पर असतात.

याबद्दल सर्वच पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी चित्रकला विभाग प्रमुख राऊत मुकुंद यांनी केलेले चित्र सन्माननीय पी आय महेश पाटील साहेब यांना पोलीस दिनानिमित्त भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर विद्यार्थ्यांचा मनातील कुतूहलाचा विषय या शस्त्रास्त्राबद्दल पोलीस दल कशी काळजी घेते,कोणत्या प्रकारचे शस्त्र,गण वापरल्या जातात याबद्दलचे प्रात्यक्षिक व शास्त्राची माहिती पोलीस हवालदार प्रवीण इंगळे,पोलीस नाईक अविनाश ढेरे,पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून शास्त्र बद्दल सविस्तर माहिती दिली व मुलांच्या मनातील शंका दूर केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील एनसीसी विभाग प्रमुख श्री अनिल देडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कलाशिक्षक श्री मुकुंद राऊत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here