जामखेड महाविद्यालयांतील मुलींची बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी विभागीय पातळीवर निवड

0
353

जामखेड न्युज——

जामखेड महाविद्यालयांतील मुलींची बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी विभागीय पातळीवर निवड

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाविद्यालय देवळाली प्रवारा येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेत जामखेड महाविद्यालय मुलीच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली.

जामखेड महाविद्याल खेळाडू श्रुती अजित गोरे अप्रतिम खेळाच्या जोरावर नेत्र दीपक कामगिरी करत 7 जानेवारी रोजी कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळा ता. देवळा जि. नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.


महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. आण्णा मोहिते यांनी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. उद्धव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष मा. अरुण (काका) चिंतामणी, संस्थेचे सचिव मा. शशिकांतजी देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेशजी मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल.डोंगरे,कला विभागाचे प्रमुख प्रा. अविनाश फलके पप्राचार्य डॉ. प्रा. सुनील नरके महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता सुधारणा कक्षचे समन्वयक प्रा. गाडेकर यांनी या विद्यार्थिनीचे तसेच मार्गदर्शक डॉ. अण्णा मोहिते यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.


याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डोंगरे एम.एल. म्हणाले की या, जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नेत्रदीपक कामगिरी केली. या विद्यार्थिनीच्या या यशाबद्दलआम्हा सर्वांना अभिमान आहे. नाशिक येथे संपन्न होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here