कोल्हेवाडी येथे अखंड त्रिदिनीय दत्त जयंती सोहळा उत्साहाचे आयोजन, डॉ. मंगेश कोल्हे यांच्या वतीने महाप्रसाद

0
454

जामखेड न्युज——

कोल्हेवाडी येथे अखंड त्रिदिनीय दत्त जयंती सोहळा उत्साहाचे आयोजन

डॉ. मंगेश कोल्हे यांच्या वतीने महाप्रसाद 

 

तुकाईनगर कोल्हेवाडी येथे दत्त जयंती निमित्त रविवार दि. २४ डिसेंबर पासून मंगळवार दि. २६ डिसेंबर पर्यंत अखंड त्रिदिनीय सप्ताहाचे आयोजन केले आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. मंगेश गौतम कोल्हे पाटील श्री गुरूदेव दत्त हाँस्पिटल कुसळंब यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

तुकाई नगर, कोल्हेवाडी, ता.जामखेड, जि.अ, नगर
येथे दत्त जयंती निमित्त त्रिदिनीय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान अध्यात्माच्या समन्वयातून जगामध्ये समन्वय आणि शांतता लाभेल या विचाराने प्रेरीत होऊन जगभर विश्वशांती व संस्कृती जोपासण्याचा हेतू उराशी बाळगुन विशेषतः भारतीय परंपरा व संस्कृती यांच्या संवर्धनासाठी मानव जातीच्या कल्याणासाठी अखंड त्रिदिनीय दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन केलेले
आहे. तरी विश्वमांगल्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे असे कोल्हेवाडी ग्रामस्थांनी सांगितले.

पहाटे ४ ते ५ काकडा आरती सायंकाळी ४ ते ६ गुरुचरित्र वाचन, ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन, ११ ते ४ हरिजागर असा दैनंदिन कार्यक्रम आहे.

५ ते ७ गुरुचरित्र हभप देवराव आप्पा कोल्हे, हभप भाऊसाहेब कोल्हे, हभप हरिश्चंद्र कोल्हे, हभप शिवाजी कोल्हे, हभप रावसाहेब कोल्हे, हभप रोहिदास कोल्हे यांच्या वतीने गुरुचरित्राचे वाचन होईल.

रविवारी दि. २४ रोजी शिवचरित्रकार हभप माऊली महाराज कोठुळे, सोमवारी २५ रोजी हभप संतोष महाराज वनवे, मंगळवार दि. २६ रोजी हभप महंत पांडुरंग शास्त्री महाराज यांचे हरिकीर्तन होईल यासाठी कोल्हेवाडी, कडभनवाडी, पिंपळवाडी, साकत, वानवेवाडी, येवलवाडी, कुसळंब, सौताडा, सावरगाव येथील भजनी मंडळ असेल.

सप्ताहासाठी गायनाचार्य म्हणून हभप अभिमान ढाकणे, हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, मृदंगाचार्य आप्पा महाराज कोठुळे, तबलावादक हभप अर्जुन नाना कोल्हे, हभप शिक्षक महाराज येवले, हार्मोनियम हभप केशव महाराज घोलप, तसेच समस्त कोल्हेवाडी भजनी मंडळ

सप्ताहासाठी व्यवस्थापक म्हणून रावसाहेब कोल्हे, गुलाब कोल्हे, संजय कोल्हे, आप्पा कोल्हे, संतोष कोल्हे, लाला कोल्हे, बळीराम कोल्हे, लक्ष्मण कोल्हे, दादासाहेब कोल्हे, तेजस कोल्हे, अस्तीक कोल्हे, समस्त तुकाई भजनी मंडळ कोल्हेवाडी असे नियोजन आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सप्ताहातील हरिकीर्तन, गायन, वादन, भजन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here