जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – खासदार डॉ. सुजय विखे पाटील

0
1512

जामखेड न्युज——

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – खासदार डॉ. सुजय विखे पाटील

 

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे व खुपच धिम्या गतीने सुरू आहे. याबाबत आजच्या बैठकीत अनेक तक्रारी करण्यात आल्या याबाबत ठेकेदारांने दर्जेदार काम करावे, निकृष्ट कामाबाबत कोणतीही तक्रार चालणार नाही. तसेच जे कोणी महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण करतील त्यांच्यावर ३५३ चे गुन्हे दाखल करा असे आदेश खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आढावा बैठकीत दिले. तसेच कामाची गती वाढविण्याच्या सूचनाही दिल्या

जामखेड येथे आज दि १० रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या कामा संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबत सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी कामाबाबत अनेक तक्रारी केल्या. तेव्हा ठेकेदार, संबंधित अधिकारी, पोलीस प्रशासन, नगरपरिषद यांना खासदार यांनी योग्य त्या सूचना दिल्या.

यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार योगेश चंद्रे , महावितरण कंपनीचे अभियंता शरद चेचर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, नगरपरिषद मुख्याधिकारी अजय साळवे, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात,

जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर, माजी सभापती सुधिर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, नगरसेवक अमित चिंतामणी, बिबिषन धनवडे, प्रा. अरूण वराट,अर्जुन म्हेत्रे, विकास राळेभात, अंकुश ढवळे, करण ढवळे, सोमनाथ राळेभात, सोमनाथ पाचरणे, मकरंद काशिद, अँड. बंकट बारवकर, अमित जाधव, सलीमभाई तांबोळी, तुषार बोथरा सह राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


यावेळी प्रा. मधुकर राळेभात यांनी रस्त्याबाबत आडचणी मांडताना सांगितले की उरलेला रस्ता एकाबाजुने जे रस्त्याचे काम सुरू आहे ते वेगाने व्हावे तसेच दुसर्‍या बाजुने रस्ता वहातुकीस व्यवस्थित करण्यात यावा ,चांगल्या दर्जाचा मुरुम टाकावा, रस्त्यावर व नाली बांधकामावर जास्त प्रमाणात पाणी मारावे आशा सुचना दिल्या.

याला उत्तर देताना खा. सुजय विखे म्हणाले की शहरातुन जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या काम वेगाने करावे रत्यावर येणारी सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील कोणाचीही गय केली जाणार नाही .काही अडचण आल्यावर फोन लावा रस्त्याच्या कामाला कोणी आडवे आले तर गुन्हे दाखल करा कोण दादागिरी करतय त्याला जशास तसे उत्तर दया थोडा फार त्रास होणार आहे. अडचण आल्यावर पोलीस प्रशासनाची मदत घ्या अशा सूचना दिल्या

यावेळी राष्ट्रवादीचे दत्तात्रय वारे म्हणाले की, वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे तरी ठेकेदाराने एका बाजूनी व्यवस्थित बॅरिकेट लावून वाहतूक कशी सुरळीत होईल अशा पद्धतीने मुरमाचा रस्ता तयार करावा व शक्यतो शहरातील रस्त्याचे काम रात्रीच्या वेळेत करावे रस्त्याच्या कडेला लागणारे वाहने ट्राफिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी असे मत व्यक्त केले.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये कसलीही दिरंगाई व दर्जा बाबत तक्रार खपवून घेतली जाणार नाही. संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी गती वाढवावी तसेचजो कोणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याची गय केले जाणार नाही. जिल्ह्यात फक्त जामखेड रस्त्याबाबत मागे आहे. लवकरच एक चांगला रस्ता जामखेडला होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here