जामखेड न्युज——
जवळा येथे बंदिस्त व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी मिळावा
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची खासदार सुजय विखेकडे निवेदनाद्वारे मागणी
जवळा येथे बंदिस्त व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी जवळा ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुजय विखे यांची हळगाव येथिल विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमांत भेट घेऊन मागणी केली. यावेळी भाजपचे नेते तथा जवळा गावाचे उपसरपंच प्रशांत शिंदे, सरपंच सुशील आव्हाड, माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन कोल्हे, प्रेम आव्हाड, पप्पू महारनवर, अनिल हजारे, शिखर मोहळकर, वैभव हजारे उपस्थित होते.
दरम्यान, भाजपाचे युवा नेते तथा उपसरपंच प्रशांत शिंदे यांनी विविध मागण्यांचे निवेदन खासदार सुजय विखे यांना दिले. त्यात जवळा येथे बंदिस्त व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी मिळावा, जवळा गावात पशुैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ मंजूर होवा, जवळा येथिल जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेत वंचित राहिलेल्या वस्त्यांचा समावेश करावा.अशा मागण्या करण्यात आल्या.
या वेळी खासदार सुजय विखे यांच्या बरोबर जवळा येथील विविध विकास कामांबद्दल सविस्तर चर्चा झाली. तसेच या कामांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी खासदार सुजय विखे यांनी दिले.
चौकट:
आज हळगाव येथे विविध विकास कामांबद्दल खासदार सुजय विखे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, जवळा येथे बंदिस्त व्यायाम शाळा बांधकामासाठी २५ लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच पशुैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विखे साहेब यांनी सांगितले आहे.
प्रशांत शिंदे – भाजपाचे युवा नेते तथा उपसरपंच, जवळा.