ठेकेदाराची गुंडागर्दी – चक्क अधिकार्‍यांला मारहाण, जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0
617
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
      तालुक्यातील हळगाव ते आघी व गोयकरवाडी
येथील रस्त्याच्या कामाची पाहणी करून हळगाव बस स्थानक परिसरात ठेकेदाराने आमच्या गाडीला आडवी गाडी लावून गाडीतून बाहेर ओढत गचांडी पकडून मारहाण केल्याची तक्रार प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता रविंद्र संसारे यांनी केली आहे..
      जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत फिर्यादी रविंद्र फकिरा संसारे कनिष्ठ अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना जामखेड यांनी म्हटले आहे की, दि. २३ रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यात करण्यात आलेल्या हळगांव  ते आगी हळगांव ते गोयकरवाडी रोडचे कामाची पाहणी करुन आमचे स्कॉर्पियो गाडी नं एम एच-16 एन-0550 या सरकारी वाहनाने हाळगाव ते ढवळेवस्ती रोड ची पाहणी करण्यासाठी निघालो असता हळगांव बस स्थानक परिसरात आरोपी ठेकेदार शरद शिवराम पवार यांने आमच्या सरकारी गाडीला आडवे येवुन फिर्यादीस म्हणाला की तुम्ही मला शिऊर ते बसरताडी रस्त्याचे केलेल्या कामात वापरलेल्या खडीचे पैसे का दिले नाहीत असे म्हणुन फिर्यादीस शिवीगाळ करुन फिर्यादीस गाडीतुन बाहेर ओटुन फिर्यादीची गचांडी धरुन चापटीने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद जामखेड पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे जामखेड परिसरातील अधिकारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी फरार झाला असून जामखेड पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
वरील घटनेचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.
  याबाबत फिर्यादी कनिष्ठ अभियंता रविंद्र संसारे
यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की, ठेकेदाराने शिवूर ते बसरवाडी येथील रस्त्याचे सहाशे मीटरचे खडीकरणाचे काम केले आहे त्याचे पैसेही त्याला मिळाले आहेत. पण त्याची काही खडी शिल्लक होती ती दुसर्‍या ठेकेदाराने वापरली तो ठेकेदार त्याच्या खडीचे पैसे देण्यास तयार आसतानाही पवार हे ठेकेदार आमच्या कडे पैशाची मागणी करत आहेत. या ठेकेदाराविरुद्ध इतरही अनेक तक्रारी आहेत. आमची काहीही चूक नसताना असे मुजोर ठेकेदार मुद्दामच आम्हाला त्रास देतात त्यामुळे त्यांचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी संसारे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here