जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कोरोना संसर्गामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जणावरांचा आठवडी बाजार बंद आहे त्यामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच इतर लहान मोठे व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत तेव्हा प्रशासनाने जामखेडचा जणावरांचा बाजार लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसिलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील कष्टकरी, सर्वसामान्य शेतकरी व ज्यांचे हातावर पोट आहे अशा व्यक्तींसाठी शनिवारचा आठवडी बाजार अत्यंत महत्त्वाचा असल्याकारणाने व जनावरांचा बाजार चालू करणे संबंधी निवेदन देण्यात आले या निवेदनाची तातडीने दखल घेत तहसीलदार यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, युवक अध्यक्ष राहुल पवार, सरपंच सरपंच कृष्णा राजे चव्हाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश डुचे, लक्ष्मण डोके, सोशल मिडीया तालुकाध्यक्ष कृष्णा डुचे, जामखेड शहराध्यक्ष भाऊसाहेब डोके, नितीन जगताप, रामहरी बाबर, शरद पवार, हनुमान पवार, सागर डोके, रामहरी डोके, सीताराम डोके, विठ्ठल डोके, आजिनाथ सातव, राम गायकवाड, प्रदीप वाळुंजकर, बाळासाहेब आजबे, सुनील बाबर, मंगेश मुळे, किरण मुळे, प्रथमेश विटकर, विशाल कोरडे, बंडू डुचे, आबा जाधव, विशाल ढोले, शंकर जाधव, अमोल खैरे, दादा निमोनकर यांच्या सह अनेक शेतकरी व्यापारी उपस्थित होते.