जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधत जामखेडच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती बेल्हेकर यांनी आरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वडाच्या झाडाची लागवड केली व वडाच्या झाडाचे पूजन केले यावेळी उपस्थित सर्व सेविका मदतनीस यांना शेवगा कढीपत्ता व लिंबोणीच्या झाडांचे वाटपही त्यांनी केले ही सर्व झाडे प्रत्येक अंगणवाडी केंद्रासमोर लावून त्यांची योग्य ती काळजी घेणे बाबत सर्व सेविका मदतनीस यांना सूचना दिल्या.

अंगणवाडीत बालके आल्यानंतर याचा दररोजच्या पोषण आहारात वापर केल्याने आहारातील पोषक घटक वाढून बालकांची पोषण स्थिती सुधारण्यास याची मदत होणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलेने फक्त झाडाची पूजा न करता प्रत्येकी एक झाड लावून ते जगवा वाढवा असे आवाहन श्रीमती ज्योती बेल्हेकर यांनी उपस्थित सर्व महिलांना केले यावेळी आरोग्य विभागाच्या पर्यवेक्षिका मनीषा गव्हाणे इतर आरोग्य कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका हिरा थोरात, सायरा तांबोळी, अर्चना निगुडे, अर्चना खर्डे, अनुसया डोळे, सारिका शिंदे व अंगणवाडी मदतनीस उपस्थित होत्या.