वटपौर्णिमेनिमित्ताने श्री साकेश्वर विद्यालयात वडाच्या झाडाची लागवड

0
241

जामखेड प्रतिनिधी

        जामखेड न्युज – – (सुदाम वराट)

  वटपौर्णिमेनिमित्ताने श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली. विद्यालयाचा माजी विद्यार्थी केशव तावरे यांनी शाळेसाठी वडाचे झाड दिले होते त्याची लागवड आज वटपौर्णिमेनिमित्ताने करण्यात आली.
       यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव मुरुमकर, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, ज्ञानदेव मुरुमकर, केशव तावरे, ग्रामपंचायत सदस्य मिलन घोडेस्वार, केशव वराट, उदयकुमार दाहितोडे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अशोक घोलप, अतुल दळवी, आण्णा विटकर, नागराज मुरुमकर, आबासाहेब घोडेस्वार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे विशेष महत्त्व आहे. परिसरात वडाचे झाड नसल्याने व वडाचे झाड अनेक दिवस टिकत असल्याने विद्यालयाचा माजी विद्यार्थी केशव तावरे यांनी शाळेसाठी वडाचे झाड दिले त्या झाडाची आज लागवड करण्यात आली. विद्यालय परिसरात लावण्यासाठी आणखी काही झाडे देणार असल्याचे तावरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here