वटपौर्णिमेनिमित्ताने नगरसेवक दिंगाबर चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने वडाच्या झाडाचा परिसर स्वच्छता करत केली सडा रांगोळी

0
190
जामखेड प्रतिनिधी
        जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
 वटसावित्री पोर्णिमेला शहरातील शिवाजीनगर परिसरात वडाचे झाड नसल्याने महिलांना वडाची पुजा करण्यासाठी दूर जावे लागत होते. ही अडचण ओळखून नगरसेवक दिंगाबर चव्हाण यांनी शिवाजीनगर परिसरात सहा महिन्यांपूर्वी वडांची झाडे लावली होती आज वटपौर्णिमा असल्याने वडाच्या झाडाचा परिसर सकाळी दिंगाबर चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने स्वच्छता करून सडा रांगोळी केली या प्रशस्त वातावरणात महिलांनी दिवसभर वडाची पुजा केली. महिलांनी नगरसेवक दिंगाबर चव्हाण यांना धन्यवाद दिले.
     आज सकाळी दिंगाबर चव्हाण मित्रमंडळाचे कार्यकर्ते दत्ता म्हेत्रे, गणेश परकड, संदिप सांगळे, अनिरुद्ध रसाळ, सुंदरदास तांबे यांनी स्वच्छता केली तर हिराबाई दिंगाबर चव्हाण, डॉ. शितल कुडके, सोनाली पांडुळे, शिवानी खामकर, संध्या चव्हाण, अनिता तांबे गायत्री राऊत या महिला मंडळांनी सडा रांगोळी करून वडाचे झाडाचे पुजन केले. दिवसभर मोठ्या प्रमाणावर महिला वडाच्या झाडाची पुजा करण्यासाठी येत होत्या सर्व महिलांची जवळ सोय झाली यामुळे सर्वानी दिंगाबर चव्हाण यांचे आभार मानले.
          राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहरात सुमारे वीस वडाच्या झाडाची लागवड केली होती त्या झाडांना संरक्षक जाळी बसवून उन्हाळ्यात टॅंकरने पाणी घातले त्यामुळे वडाची झाडे चांगली डेरेदार झालेली आहेत. शिवाजीनगर परिसरातील महिलांची या वडाच्या झाडांमुळे चांगली सोय झाली.
       दिंगाबर चव्हाण हे अहोरात्र जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असतात. सकाळी व सायंकाळी प्रभागात एक चक्कर मारणे लोकांच्या अडीअडचणी सोडविणे कोठे गटार तुंबलेले असेल तर स्वतः काढणे हि कामे करत असतात. तीन वर्षांपूर्वी धोत्री परिसरात सुमारे तीनशे झाडांची लागवड केली त्यांच्या संरक्षणासाठी जाळी बसवली व उन्हाळ्यात पदरमोड करून टॅंकरने पाणी घातले त्यामुळे आज परिसर हरित झाला आहे. तसेच पाणी टंचाईच्या काळात स्वतः टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला धोत्री परिसरात ज्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता तेथे मुरमीकरण केले पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी कुपनलिका घेतली व मोटार बसवून दिली. दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी नगर परिसरात वीस वडाच्या झाडाची लागवड केली व आज झाडांच्या परिसराची स्वच्छता करून सडा रांगोळी करून परिसरातील महिलांसाठी चांगली सोय केली. त्यामुळे महिलांनी नगरसेवक दिंगाबर चव्हाण यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here