अखेर बिबट्या जेरबंद!!! नागरिकांनी काळजी घ्यावी – वनाधिकारी मोहन शेळके

0
580

जामखेड न्युज——

अखेर बिबट्या जेरबंद!!!

नागरिकांनी काळजी घ्यावी – वनाधिकारी मोहन शेळके

 

अरणगाव येथील निगुडे वस्ती येथे नवनाथ श्रीरंग पारे व तात्याराम निगुडे यांच्या शेतातील पन्नास फूट खोल विहिरीत बिबट्या पडला होता. विहिरीत पाणी असल्याने तो जिवंत होता कपारीचा आधार घेऊन तो बसला होता. वनविभागाने ग्रामस्थांच्या सहकार्याने चार तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले.

.
अरणगाव येथील निगुडे वस्ती येथे विहिरीत बिबट्या असल्याची माहिती कळताच अरणगावचे सरपंच लहु शिंदे, अंकुश शिंदे, उपसरपंच आप्पा राऊत, ग्रामपंचायत सदस्य तात्याराम निगुडे, रमजान शेख, गोवर्धन राऊत, कैलास निगुडे, कैलास म्हस्के, अर्जुन निगुडे, विष्णू निगुडे व गावकरी यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली व बिबट्या पाहून वनविभागास संपर्क केला उपविभागीय वनाधिकारी मोहन शेळके यांच्याशी संपर्क केला वनविभागाने तातडीने पिंजरा घेऊन घटना स्थळी धाव घेतली. यावेळी वनविभागाचे वनरक्षक आजीनाथ भोसले, वनसेवक संजय अडसूळ, शरद सुर्यवंशी, बबन महारनवर यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने चार तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळाले.

तालुक्यातील जातेगाव, नायगाव, धामणगाव, मोहरी, दिघोळ परिसरात बिबट्या असल्याच्या बातम्या येत होत्या वनविभागाने अनेक वेळा पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. काही दिवसांपूर्वी धामणगाव येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला होता.

आज मौजे अरणगांव ता.जामखेड येथील श्री.नवनाथ पारे यांचे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत जामखेड मोहन शेळके यांचे मार्गदर्शनाखाली व सरपंच लहु शिंदे, अंकुश शिंदे व इतर ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्याने वनपाल राजेंद्र भोसले, वनपाल सुरेश भोसले, वनरक्षक प्रविण ऊबाळे, आजिनाथ भोसले, रवि राठोड वनकर्मचारी श्याम डोंगरे, शिवाजी चिलगर,राघु सुरवशे, महेश काळदाते,शरद सुर्यवंशी, हरिश्चंद्र माळशिखारे,संजय अडसूळ, सुभाष धनवे, यांनी शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला सुखरूप जेरबंद करुन विहिरी बाहेर काढण्यात यश मिळाले.


पुढील कार्यवाही वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात येईल. बिबट्याचा वावर असलेल्या अदिवासात त्याला सोडण्यात येईल. जेरबंद करण्यात आलेला बिबट्या हा दोन वर्षे वयाचा असल्याचा अंदाज आहे तसेच पन्नास फूट विहिरीत पडूनही बिबट्यास कसलीही दुखापत झाली नाही. कसलाही जखम नाही. तरीही पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत आरोग्य तपासणी करून वरिष्ठांच्या सल्ल्याने कारवाई करू

बिबट्या जेरबंद करताना परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. कसलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

चौकट

बिबट्या परत तालुक्यात दिसल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. तेव्हा नागरिकांनी अंधारात फिरू नये, बॅटरी बरोबर ठेवावी, मोबाईल वर गाणे लावावीत, शेळ्या, मेंढ्या, वासरे कुंपणाच्या आत ठेवावेत हातात नेहमी काठी असावी. आपल्या पशूंची काळजी घ्यावी.

उपविभागीय वनाधिकारी मोहन शेळके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here