Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाडव्यानिमित्त कांदा खरेदी केंद्र सुरू

शेतकऱ्यांच्या हितासाठी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाडव्यानिमित्त कांदा खरेदी केंद्र सुरू

0
514

जामखेड न्युज——

शेतकऱ्यांच्या हितासाठी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाडव्यानिमित्त कांदा खरेदी केंद्र सुरू

परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाडव्यानिमित्त नवीन कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले यामुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अलंकार ट्रेडर्स या नवीन कांदा खरेदी आडतीचे उद्घाटन करण्यात आले.

जामखेड परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे उत्पन्न घेतले जाते व हा कांदा योग्य भाव मिळावा या करिता नगर, सोलापूर तसेच कडा या शहरांमध्ये विक्रीसाठी जात होता. शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च व जाण्या येण्यासाठी वेळ जात होता आता जामखेड मध्ये केंद्र सुरू झाल्याने वेळ व पैसा वाचणार आहे.

कांदा खरेदीसाठी बाहेरचे व्यापारी जामखेड मध्ये यावेत व येथील शेतकऱ्यांना विक्रमी भाव मिळावा याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती तसेच संचालक मंडळ हे नियमित प्रयत्न करत असतात याच प्रयत्नाच्या माध्यमातून आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अलंकार ट्रेडर्स या नवीन कांदा खरेदी केंद्राचे उद्घाटन बाजार समिती आवारामध्ये करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले, उपसभापती श्री.कैलास वराट, संचालक श्री.सचिन नाना घुमरे श्री.नंदू आबा गोरे, श्री.विठ्ठल चव्हाण, सुधीर राळेभात, डॉक्टर गणेश जगताप, बबनराव लोंढे, सुरेश पवार, गजानन शिंदे, सतीश शिंदे, राहुल बेदमुथा 

सचिव वाहेद सय्यद, अलंकार ट्रेडर्स या नवीन दुकानाचे मालक बबलू शेठ तांबोळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नवीन दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!