जामखेड न्युज——
सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथीनिमित्त साकत सप्ताहाध्ये ह.भ.प.उत्तम महाराज वराट यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता
साकतमध्ये श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताहामध्ये आज ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील भाविक भक्त ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यांनी किर्तन सेवेसाठी पुढील गौळण निवडली होती
मैं भूली घर जानी बाट।
गोरस बेचन आयें हाट॥
कान्हा रे मन मोहन लाल।
सब ही बिसरूँ देखें गोपाल॥
कहाँ पग डारूँ देख आनेरा।
देखें तो सब वोहिन घेरा॥
हूँ तो थकित भैर तुका।
भागा रे सब मन का धोका॥
कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी
हभप कैलास महाराज भोरे, हभप हरीभाऊ काळे, हभप बिभीषण महाराज कोकाटे, हभप माऊली महाराज कोल्हे, अशोक सपकाळ महाराज, उतरेश्वर महाराज वराट, बाबा महाराज मुरूमकर, रंगनाथ महाराज भोरे, बळीराम दळवी, नारायण महाराज, कल्याण महाराज महारनवर, आजीनाथ पुलवळे, पांडुरंग अडसूळ, मनोज महाराज राजगुरू, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, प्राचार्य श्रीराम मुरूमकर, शहादेव वराट, प्रमोद मुरूमकर, राम मुरूमकर, राजकुमार थोरवे, भरत लहाने, नारायण लहाने, महादेव वराट सह जामखेड भजनी मंडळ, तसेच पारगाव, साकत, ढाळेवाडी, अनपटवाडी, धामणगाव, देवदैठण, पिंपळवाडी, भजनी मंडळ यांच्या सह फोटो ग्राफर शिवशंभो फोटो अतुल दळवी तसेच मोठ्या प्रमाणावर श्रोते हजर होते.
साकतमध्ये श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४१ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांनी या सप्ताहिसाठी हजेरी लावली होती या किर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हभप पंडित केशव महाराज जगदाळे, जालिंदर बप्पा येडशीकर, भरत पठाडे, आसाराम महाराज साबळे, बाजीराव महाराज वराट, मदन महाराज टिपरे, उत्तरेश्वर महाराज टिपरे, भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, बाळू सुरवसे, मच्छिंद्र वाळेकर, हरिदास आबा गुंड, दिपक अडसूळ यांची खास उपस्थिती होती.
गायनाचार्य – हभप बिभीषण महाराज कोकाटे, हरीभाऊ महाराज काळे, कृष्णा महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, भरत महाराज साठे, नामदेव चव्हाण, अशोक सपकाळ, दिनकर मुरूमकर, भास्कर फुंदे, केशव घोलप, विष्णू म्हेत्रे, दादा आजबे, भाऊसाहेब कोल्हे, पंढरीनाथ राजगुरू, भरत घोलप, आण्णा घुमरे, गहिनीनाथ सकुंडे, प्रकाश महारनवर, नाना महारनवर, जालिंदर महारनवर, कल्याण राऊत, दत्ता घुमरे सह परिसरातील सर्व भजनी मंडळे यांचा सहभाग होता.
भजन कीर्तन व्यवस्थापक दिनकर मुरूमकर, श्रीकांत वराट, पांडुरंग अडसूळ, रामकिसन लहाने, दिपक अडसूळ यांच्या सह परिसरातील भजनी मंडळे आहेत. तसेच गावातील भजनी मंडळ व नर्मदेश्वर वारकरी गुरूकुलातील सर्व विद्यार्थी सात दिवस हजर होते.
सप्ताहाचे संयोजक म्हणून हभप विवेकानंद भारती महाराज उर्फ उत्तम महाराज वराट, मृदंगाचार्य बाजीराव महाराज वराट व उत्तरेश्वर महाराज वराट यांच्या सह संपूर्ण गावकरी नियोजन करत आहेत