जामखेड न्युज——
प्रा. सचिन गायवळ यांची महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड, जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा
तालुक्यातील सोनेगाव येथील प्रा. सचिन गायवळ यांची आपल्या समाजसेवेच्या कार्याने परिसरात नव्हे तर तालुक्यात एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. परिसरातील तरूणांच्या गळ्यातील ते ताईत झाले आहेत.
आणि आता महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे यामुळे जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांचे सर्वच स्थरावरून अभिनंदन केले जात आहे.
सचिन गायवळ हे या अगोदर पुणे जिल्हा बास्केटबॉल सचिव पदी होते. आता त्यांची निवड महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या उपाध्यक्ष पदी झाली आहे. सचिन गायवळ यांची क्रीडाक्षेत्रात महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी बिनविरोध झालेली निवड जामखेड तालुक्यासाठी सन्मानाची बाब आहे. क्रीडा क्षेत्रात कुठलाही कौटुंबिक वारसा नसताना स्वकर्तुत्वाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.
प्रा. सचिन गायवळ यांनी समाजकारणात, राजकारणात व शिक्षणक्षेत्रात आपली जामखेड तालुक्यात एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. कोरोना काळात आरोळे कोविड सेंटरला मोठ्या प्रमाणात मदत केली होती तसेच अनेकांना वैयक्तिक मदतही केलेली आहे. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव यामध्ये ते मोठ्या प्रमाणात मदत करतात ती युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
सचिन गायवळ यांनी राजकारणाशिवाय समाजकारण, आणि समाजसेवा कशी करायची याचा आदर्शच त्यांनी समाजापुढे घालून दिला आहे आणि त्यामुळेच प्रा. सचिन गायवळ यांची लोकप्रियता खर्डा परिसर व जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांची महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.