जामखेड न्युज——
खासदार व आमदार यांच्या आश्वासनानंतर मोहा सरपंचाचे उपोषण मागे
मोहा गावातील झेंडे वस्ती व गायकवाड वस्ती येथे विजेची सिंगल फेज ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी मोहा सरपंच भीमराव कापसे व ग्रामस्थ आज सकाळी महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. या उपोषणाची दखल घेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार रोहित पवार यांनी दखल घेत दहा ते पंधरा दिवसांच्या आत ट्रान्सफार्मरचा प्रश्न मार्गी लावू असे सरपंच भिमराव कापसे यांना आश्वासन दिले त्यामुळे सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.
मोहा ग्रामपंचायत मध्ये २०२२ मंजुरी दलित वस्ती ट्रान्सफर मंजूर होता महावितरणने तो प्रस्ताव
समाजकल्याण कडे पाठविला होता निधी अभावी रखडला होता. दहा ते पंधरा दिवसांत निधी उपलब्ध करून ट्रान्सफार्मरचा प्रश्न मार्गी लावू असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार रोहित पवार यांनी सरपंच भिमराव कापसे यांना फोनवर सांगितले यानुसार उपोषण मागे घेण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत महावितरणकडून लेखी अर्ज दिला होता. तोंडी पाठपुरावा केला अंदोलन उपोषण करण्याचा इशारा दिला मात्र संबधित आधिकार्यांनी कसलीही दखल घेतली नाही .विजेअभावी होणारा त्रास सहन करावा लागत होता. संबधित विभागला ग्रामस्थांच्या त्रासाची जाणीव करून देण्यासाठी व जाग आणण्यासाठी सरपंच भिमराव कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. खासदार व आमदार यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
या उपोषणाला माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, सावरगावचे सरपंच काका चव्हाण, महादेव वराट, बापुसाहेब गायकवाड, विशाल अब्दुले यांनी भेट दिली.
सकाळी उपोषणासाठी सरपंच भिमराव कापसे, माजी सरपंच शिवाजी डोंगरे ,ग्रामपंचायत सदस्य पंडित गायकवाड, वसंत झेंडे, विनोद इंगळे, विकास सांगळे,वामन डोंगरे ,प्रमोद रेडे ,पांडुरंग देडे, तसेच रिपब्लिकन सेनेचे बाळासाहेब गायकवाड, दत्ता, नंदकुमार गायकवाड ,आकाश जोगदंड, लिलाबाई गायकवाड ,संजय गायकवाड ,मंदाबाई गायकवाड, काजल गायकवाड, छाया गायकवाड ,अनिता गायकवाड ,रमेश नवगिरे पोपट गायकवाड, आदी ग्रामस्थ उपस्थित होते .