जामखेड न्युज——
जामखेड येथे शालेय विभागीय वुशु स्पर्धेला उत्साहात सुरवात
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,व जिल्हा क्रीडा परिषद अ.नगर आणि अ.नगर जिल्हा वुशु संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय शालेय वुशु क्रीडा स्पर्धा जगदंबा लॉन्स,जामखेड येथे आज स्पर्धेचे उदघाटन झाले.
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रा.मधुकर राळेभात, शिवसेना तालुकाप्रमुख संजय (काका) काशीद, सौ.रोहिनीताई काशीद, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, अ.नगर वुशु जिल्हा संघटनेचे सचिव प्रा.लक्ष्मण उदमले, उपाध्यक्ष शाम पंडित, प्रल्हाद साळुंके यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दि. २० रोजी मुलींच्या स्पर्धा शांततेत पार पडल्या. तर २१ रोजी मुलांच्या स्पर्धा आहेत. या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धक उपस्थित होते.