परमेश्वर घोडेस्वार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
1168

जामखेड न्युज——

परमेश्वर घोडेस्वार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 

जामखेड तालुक्यातील साकत येथील परमेश्वर निवृत्ती घोडेस्वार (वय ५३) यांचे साकत येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले यामुळे साकत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

परमेश्वर घोडेस्वार यांनी काल शुक्रवार दिवसभर शेतात पेरणीचे काम केले होते सायंकाळी घरी आल्यावर गावात शेंगदाणे घेण्यासाठी दुकानात आले शेंगदाणे घेऊन घरी निघाले असता दुकानासमोरच चक्कर आली आणी खाली पडले ताबडतोब त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे साकत परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

परमेश्वर घोडेस्वार हे कपडे शिवण्याचे कामही करत होते. यामुळे ते टेलर नावाने परिचित होते. त्यांनी कष्ट करून आपल्या तिनही मुलांना उच्च शिक्षित केले थोरला मुलगा प्रशांत हा पुणे येथे इंजिनिअर आहे. दुसरा मुलगा प्रदिप हा एमएस्सी झालेला आहे तसेच मुलगी प्रांजली हिपण उच्च शिक्षित आहे. तिनही मुले खुपच गुणी आहेत.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी (विवाहित) असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here