जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक जोमात
तीन ग्रामपंचायत सरपंच पदासाठी २४ अर्ज तर २९ सदस्यांसाठी १२८ अर्ज दाखल
जामखेड तालुक्यातील जवळा, मतेवाडी, मूंजेवाडी या तीन ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लागला असून २० आँक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन ग्रामपंचायत सरपंच पदासाठी २४ अर्ज तर २९ सदस्यांसाठी १२८ अर्ज दाखल झाले आहेत. माघार घेण्याच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल.
जवळा ग्रामपंचायतमध्ये
एकूण पद
सरपंच 1
सदस्य 15
प्राप्त नामनिर्देशन पत्र
सरपंच 14
सदस्य 88
एकूण 102
ग्रामपंचायत मतेवाडी
सरपंच 1
सदस्य 7
प्राप्त नामनिर्देशन पत्र
सरपंच 6
सदस्य 22
एकूण 28
ग्रामपंचायत मुंजेवाडी
सरपंच 1
सदस्य 7
नामनिर्देशन पत्र प्राप्त
सरपंच 4
सदस्य 18
एकूण 22
असे तीन ग्रामपंचायत सरपंच पदासाठी २४ अर्ज
तर २९ सदस्यांसाठी १२८ अर्ज दाखल दाखल झाले आहेत.
तालुक्यात मोठी असलेल्या जवळा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२३ च्या निवडणुकीत सदस्यपदाच्या १५ जागेसाठी ८८ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच सरपंचपद राखीव असल्याने सरपंचपदासाठी १४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. जवळा गावात शेतकरी ग्रामविकास आघाडी जवळा तसेच जवळा ग्रामविकास पँनल यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले गेले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गव्हाणे एन.यू तर सहाय्यक म्हणून धूमाळ एम एस यांनी काम पाहिले आहे.
मतेवाडी ग्रामपंचायतमध्ये सदस्यपदाच्या ७ जागेसाठी २२ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून सरपंचपदासाठी ६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.यामध्ये प्रभाग १ मध्ये तीन जागेसाठी ८ अर्ज, प्रभाग२ मध्ये दोन जागेसाठी ७ अर्ज तर प्रभाग ३ मध्ये दोन जागेसाठी ७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
तसेच मूंजेवाडी ग्रामपंचायतमध्ये
प्रभाग१ मध्ये तीन जागेसाठी साठी ६ अर्ज, प्रभाग २ मध्ये २जागेसाठी ४अर्ज तर प्रभाग ३मध्ये २ जागेसाठी साठी अर्ज दाखल केले आहेत.
सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव असून सरपंचपदासाठी ४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी लटके बी एस तर सहाय्यक म्हणून सुखदेव कारंडे, पी व्ही धावडे यांनी काम पाहिले आहे.