जामखेड न्युज ——–
दारूच्या नशेत कुटुंबच उधवस्त, दिराकडून झालेल्या मारहाणीत भावजईचा मृत्यू, नवरा व दिर जेलमध्ये
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असून त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. अशीच घटना दोन दिवसांपूर्वी जामखेड तालुक्यातील साकतमध्ये घडली. सीमा घोडेस्वार दिवसभर शेतात मोलमजुरी करून सायंकाळी घरी आली तर घरात किराणा सामान नाही. नवरा व दिर दिवसभर दारूच्या नशेत गावातच मुलीला सोबत घेऊन सीमा नवऱ्याकडे पैसे मागू लागली तेव्हा दोघात झटापट झाली सीमानेही नवऱ्याच्या तोंडात चापट मारली याचा राग मनात धरून दिराने घरी येत दारूच्या नशेत सीमाला ढपलीने मारहाण केली यातच सीमाचा मृत्यू झाला. आता नवरा व दिर अटक आहेत. काही क्षणात दारूच्या नशेत होत्याचे नव्हते झाले यामुळे गावा गावातील अनाधिकृत दारूचे दुकाने बंद करावेत अशी मागणी होत आहे.
आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणानाहीत अवैध दारू विक्री होत आहे. दारूच्या नशेत तरुण पिढी बरबाद होत आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. दारूच्या दकानदाराचे प्रशासनाबरोबर लागेबांधे असल्याने ते राजरोसपणे विक्री करतात यात अनेक तरूण वाहवले जातात.
घरात किराणामाल आणण्यासाठी पैसे नाहीत म्हणून मुलीला सोबत घेत मयत सीमा ही पती बसलेल्या ठिकाणी जाऊन पतीच्या खिशातून चारशे रुपये काढून घेतले. यावेळी पती बरोबर झटापट झाली पतीने शिवीगाळ व मारहाण केली तेव्हा मयत सीमानेही पतीच्या तोंडात चापट मारली याचा राग मनात धरून दिराने घरी येत भावजईला शिवीगाळ करत ढपलीने डोक्यावर व पाठीवर मारहाण केली. शेजाऱ्यांनी सीमाला जामखेड येथे दवाखान्यात नेले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपी पती बाळू अरूण घोडेस्वार व दिर अतुल अरूण घोडेस्वार या दोघांना अटक केली व सध्या ते जेलमध्ये आहेत.
याबाबत मयत सीमाच्या वडिलांनी सांगितले की,
दि. ८ रोजी नात दिक्षा हिचा फोन आला व रडायला सुरूवात केली आणि सांगितले की, अंकलने मम्मीला खुप मारले आहे. ती बेशुद्ध पडली आहे. मी व माझा मुलगा ताबडतोब साकतला येण्यासाठी निघालो साकतला आल्यावर आम्हाला समजले की, सीमाला अंकुश घोडेस्वार व इतर नातेवाईकांनी जामखेडला दवाखान्यात नेले आहे. आम्ही ताबडतोब जामखेड येथील सहारा हाँस्पिटलला आलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की डोक्याला खुप मार लागला आहे. रक्तस्राव होत आहे पेशन्टला नगरला हलवावे लागेल. आमच्या कडे पैसे नसल्याने आम्ही सरकारी दवाखान्यात आणले तर तेथील डॉक्टरांनी सीमाला मृत घोषित केले. सीमावर साकत येथे सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दारूच्या नशेत होत्याचे नव्हते झाले सीमा घोडेस्वार यांचे दिराने मारलेल्या ढलपीमुळे निधन झाले. पती व दिर दारूच्या नशेत होते सध्या ते जेलमध्ये आहेत.
संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील दारूचे दुकाने बंद करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.