ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त रविवारी जामखेडला एक दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

0
214

जामखेड न्युज——

ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त रविवारी जामखेडला एक दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

 


श्रीज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त जामखेड शहरातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रविवार दि.८ ऑक्टोबर रोजी एक दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या पारायणास जास्तीत जास्त वाचाकांनी सहभागी व्हावे व येताना स्वतःचा ग्रंथ आणावा असे आवाहन पंढरीनाथ महाराज राजगुरु यांनी केले आहे.

आज बुधवार दि. ४ ऑक्टोबरला श्रीज्ञानेश्वरी जयंती आहे. यानिमित्ताने येत्या रविवारी एकदिवसीय श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरदारवर्गाला व विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे म्हणून दरवर्षी सुट्टीच्या दिवशी रविवारी पारायण ठेवले जाते.

गेल्या तीन वर्षापासून श्रीज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्रीविठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने ह.भ.प. श्री. विजय महाराज बागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये एक दिवसीय श्री ज्ञानेश्वरी पारायण करण्यात येते. गेल्या वर्षी यामध्ये 155 वाचकांनी सहभाग नोंदविला होता.

रविवारी सकाळी सात वाजता पारायणास सुरुवात होईल आलेल्या सर्व वाचकांसाठी चहा नाश्ता व भोजनाची व्यवस्था केलेली आहे. असे आयोजकाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here