जामखेड न्युज——
खर्डा आठवडे शेळी मेंढी बाजाराचा शेतकऱ्यांना फायदा होणार -उपसभापती कैलास वराट
उपसभापती कैलास वराट यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ
तालुक्यातील खर्डा येथे आज सुरू झालेल्या आठवडे शेळी मेंढी बाजाराचा परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल तसेच लवकरात लवकर जनावरांचा बाजार सुरू करण्यात येईल असे जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी सांगितले
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन खर्डा येथील उपबाजार समिती येथे आठवड्याला पशुधन बाजाराचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला
यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती रवी सुरवसे, खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच संजिवनी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल चव्हाण, गजानन शिंदे, वैजीनाथ पाटील, सचिव वाहेद सय्यद, किरण मोरे, शिवाजी ढगे , भोगे, अनंते यांच्या सह पंचक्रोशीतील व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज दिनांक २१/०९/२३ वार गुरवार या दिवशी खर्डा येथे पशुधन बाजार सुरू झाला आहे. आता जामखेडच्या आठवडा बाजारासोबत आणखी एक नवा पर्याय मिळाला आहे यामुळे परिसरातील शेतकरी व व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
सध्या अहमदनगर जिल्ह्यात लंपीच्या साथीमुळे जनावरांचे बाजार भरविण्यात अडचणी निर्माण झाल्या असल्या कारणाने सुरूवातीला खर्डा येथे शेळी, मेंढी, बोकड या पशुधनाच्या खरेदी विक्रीसाठी खर्डा येथे नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या कारणाने हा निर्णय जामखेड बाजार समितीकडुन घेण्यात आला आहे. तरी पशुधन खरेदी विक्री करणाऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेडचे उपसभापती कैलास वराट यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले आहे.