जामखेड न्युज——
जामखेड शिक्षण विभागाच्या वतीने कर्तृत्ववान महिलेचा सत्कार
जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरदार अतिशय खडतर परिस्थिती वर मात करत यश संपादन करणाऱ्या कर्तृत्ववान महिला म्हणजे जामखेड पोलीस स्टेशनच्या ए.पी.आय संगिता गिरी यांचा जामखेड शिक्षण विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जामखेड तालुका पोलीस स्टेशनच्या नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगिता गिरी यांचा जामखेड तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्रीम गिरी मॅडम यांनी अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून जिद्द व मेहनीतीच्या जोरावर कष्टाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.त्यानंतर त्यांना प्रमोशन मिळून सहाय्यक पोलीस निरीक्षक झाल्या हि खरंच अभिमानाची गोष्ट असून इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी डॉ.संजय भोरे, केंद्रप्रमुख श्री सुरेश मोहिते,श्री बाळासाहेब कुमटकर पाटोदा शाळेचे मुख्याध्यापक श्री खवले, धनराज पवार आदि मान्यवर उपस्थित होते.