जामखेड न्युज——
सहाय्यक विक्रीकर परीक्षेतील यशाबद्दल श्रीकृष्ण हनुमंत वराट यांचा स्वर्गीय देवराव दिगंबर वराट काँलेज आँफ फार्मसी साकत मध्ये सत्कार संपन्न

तालुक्यातील साकत येथील श्रीकृष्ण हनुमंत वराट यांने एप्रिल २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विक्रीकर सहाय्यक अधिकारी परीक्षेत (ओबीसी प्रवर्गात) पाचवा क्रमांक पटकावला त्याच्या यशाबद्दल कै. देवराव दिगंबर वराट काँलेज आँफ फार्मसी साकत तर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, श्री संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट, हभप उत्तम महाराज वराट, माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, काँलेजचे प्राचार्य गोरक्ष बारगजे, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, सेवा संस्थेचे सदस्य नानासाहेब लहाने, कृष्णा पुलवळे, बाळासाहेब लोहार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्रीकृष्ण हनुमंत वराट याने साकत सारख्या ग्रामीण भागात अभ्यास करत यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत श्री साकेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. २०१२ मध्ये त्यांने ८८.७३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला होता. तो एक गुणी विद्यार्थी होता. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरदार हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे मंत्रालय लिपीक पदावरही नियुक्ती झाली व साहाय्यक विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाली आहे. एकाच वेळी दोन पदे मिळाली आहेत. सहाय्यक विक्रीकर परीक्षेतील यशाबद्दल श्रीकृष्ण हनुमंत वराट यांचा स्वर्गीय देवराव दिगंबर वराट काँलेज आँफ फार्मसी साकत मध्ये सत्कार करण्यात आला.

श्रीकृष्ण हनुमंत वराट म्हणाले की, जिद्द, चिकाटी व मेहनत घेतली की, यश मिळतेच जरी अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करा यश मिळतेच तसेच अभ्यासात सातत्य ठेवा असा सल्ला दिला.


