जामखेड न्युज——
ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सिद्धी रासकर थाळी फेममध्ये जिल्ह्यात प्रथम
अहमदनगर जिल्हा क्रीडा असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
नुकत्याच पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लोणी प्रवरा येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये विद्यालयातील पुढील खेळाडूंनी विजय संपादन केला व त्यांची 16 वर्ष वयोगट ३०सप्टेंबर २०२३ रोजी डेरवण रत्नागिरी
तर 18 वर्ष वयोगट 4 ऑक्टोबर 2023 नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
१) ची.प्रेम अनिल जाधव
(16वर्षे वयोगट मुले 5000 मीटर चालणे प्रथम)
2)ची.गौरव दत्ता रासने. (18 वर्ष वयोगट मुले 10000 मीटर चालणे प्रथम)
3) कु.सिध्दी अर्जुन रासकर
(१६ वर्षे वयोगट मुली थाळी फेक प्रथम)
4) चि.फरहान अन्सार शेख
(16 वर्षे वयोगट मुले थाळी फेक तृतीय)
5) कु. शुभांगी बबन बनकर (16 वर्ष वयोगट मुली गोळा फेक तृतीय)
वरील विद्यार्थी व विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे, पर्यवेक्षक पी. टी. गायकवाड, क्रीडा शिक्षक राघवेंद्र धनलगडे, साळुंखे सर, पाटील सर, बापू जरे सर सह सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.