जामखेड न्युज——
लोकवर्गणीतून स्मशानभूमीचे सुशोभीकरण व वृक्षारोपण हा साकतचा आदर्श जिल्हा घेईल – तहसीलदार योगेश चंद्रे
एखादा कार्यक्रम लोकवर्गणीतून होतो व सर्वसामान्य लोक यासाठी आपला सहभाग नोंदवतात हा कार्यक्रम टिकाऊ असतो. लोकवर्गणीतून गावच्या स्मशानभूमीचे सुशोभीकरण व वृक्षारोपण हा आदर्श संपूर्ण जिल्ह्यात निर्माण होईल व जिल्ह्यातील अनेक गावे आपापल्या गावातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करतील असा असे मत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.
साकत येथे लोकवर्गणीतून स्मशानभूमीचे सुशोभीकरण व वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून तहसीलदार योगेश चंद्रे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अशोक शेळके, वंचित बहुजन आघाडीचे
अँड. डॉ. अरूण जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, पोलीस पाटील महादेव वराट, माजी चेअरमन हनुमंत वराट, माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, कृषी सहाय्यक प्रशांत जाधव, बाळासाहेब वराट, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, हरीभाऊ वराट, बबन गायकवाड, कैलास मुरूमकर, नागराज मुरूमकर, गंगाराम घोडेस्वार, दादासाहेब घोडेस्वार, बंडू पुलवळे, अभिमान घोडेस्वार, रोहित घोडेस्वार, रामभाऊ मुरूमकर, बिभीषण वराट, प्रभु वराट गुरूजी, रामचंद्र वराट गुरूजी, त्रिंबक पुलवळे, रावसाहेब घोडेस्वार, अजित वराट, छगाताई पुलवळे, आण्णासाहेब मुरूमकर, आप्पासाहेब मुरूमकर, विठ्ठल पुलवळे, महादेव वराट, अँड.संपत पुलवळे, बाळू घोडेस्वार, कल्याण घोडेस्वार, नवनाथ वराट, परमेश्वर घोडेस्वार, विकी घोडेस्वार, वाल्मिक कोल्हे यांच्या सह अनेक मान्यवर व तरूण उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार म्हणाले की, गावाचा विकास तरूणांनी हातात घ्यावा ज्येष्ठानी मार्गदर्शन करावे आपण स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपणाचा छान कार्यक्रम घेत आहात आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, वृक्ष संवर्धन करणे.
यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट म्हणाले की, गावाच्या घाणीमुळे परिसरात नावे ठेवले जात होते. यामुळे गावातील तरूणांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून स्मशानभूमी सुशोभीकरण व वृक्षारोपण कार्यक्रम घेतला हा अगदी स्तुत्य उपक्रम आहे. आता झाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा आगळावेगळ्या कार्यक्रमाची समाजाला खरी गरज होती. ती आज पुर्ण झाली आहे. आता वृक्ष संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे.
यावेळी बोलताना माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर म्हणाले की, सर्वाना वाटले स्मशानभूमी आमची आहे म्हणूनच चांगली लोकवर्गणी झाली. यातून वृक्षारोपण व सुशोभीकरण होत आहे. आता आपली सर्वाची जबाबदारी आहे वृक्षसंवर्धन करणे आता तरूणांनी चांगल्या सुविधांसाठी योग्य नियोजन करावे.
यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे
अँड. डॉ. अरूण जाधव म्हणाले की, लोकवर्गणीतून स्मशानभूमी सुशोभीकरण व वृक्षारोपण हा परिवर्तनाचा लढा आहे. लोकवर्गणीतून झालेला विकास टिकाऊ असतो. ही गावाची संपत्ती आहे. तिचा योग्य विकास होत आहे. लोकांनी याचा योग्य वापर करावा. साकत गाव एकोप्याचे आहे लोकवर्गणीतून स्मशानभूमी सुशोभीकरण हा परिवर्तनाचा आदर्श आहे. हा कार्यक्रम तालुक्याला दिशा देणारा ठरणार आहे.
कार्यक्रमाच सूत्रसंचालन अभिमान घोडेस्वार यांनी तर आभार रोहित घोडेस्वार यांनी मानले.