जामखेडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहातील कारभार सुरळीत चालू

0
9

जामखेड न्युज—–

जामखेडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहातील कारभार सुरळीत चालू

 

जामखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह व संत भगवान बाबा ऊसतोड कामगार वसतीगृहाच्या वसतीगृहाच्या अधिक्षक पदाचा पदभार अनिल गर्जे यांच्याकडे आहे. याठिकाणी असलेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृहातील कारभार सुरळीत चालु असे काही पत्रकार यांनी दिलेल्या भेटीवरुन दिसुन आले.

जामखेड शहरातील काही पत्रकार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृहास अचानक भेट दिली. यावेळी वसतीगृहात मुलांना योग्य त्या सोवी सुविधा मिळत आसुन यामध्ये निरवभत्ता, स्टेशनरी, गमगुटछत्री रक्कम मिळाली आहे. असे विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहिती नुसार आढळून आले आहे.
तसेच अधिक्षक व विद्यार्थींचा सुसंवाद चांगला आहे. अधिक्षक हे वसतीगृहामध्ये मुक्कामी रहातात आशी माहिती विद्यार्थींनी दिली आहे. एकंदरीत वसतीगृहाचे कामकाज समाधान कारकार दिसुन आले आहे. तसेच वसतीगृहात विद्यार्थींच्या निवास व जेवन सुरक्षा याबाबत काटेकोर पणे काळजी घेतली जात आहे आसे देखील पत्रकार यांना आढळून आले आहे. तसेच या वसतीगृहात वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात अशी माहिती मिळाली. जामखेड शहरातील पत्रकारांनी दिलेल्या अचानक भेटीत या वसतीगृहात सर्व कारभार सुरळीत चालु असल्याचे दिसून आले तसेच विद्यार्थींनी व्यवस्थित माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here