जामखेड न्युज——
जामखेडमध्ये शिव-शक्ती परिक्रमा यात्रेत पंकजा मुंडे यांच्या वर जेसीबीतून फुलाची उधळण
संघर्ष कन्या पंकजा मुंडे यांची शिव-शक्ती परिक्रमा यात्रा आज जामखेड शहरात आली यावेळी कार्यकर्त्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत केलं. आमदार राम शिंदे यावेळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून पंकजा मुंडे भावूक होत म्हणाल्या, मुंडे साहेबांइतकंच माझेवरही प्रेम केलं जातंय
यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, डॉ. भगवानराव मुरूमकर, अमित चिंतामणी, बिबिषन धनवडे, सोमनाथ राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, प्रविण सानप, मनोज कुलकर्णी, गौतम उतेकरउतेकर यांच्या सह अनेक भाजपा कार्यकर्ते व पंकजा मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड व खर्डा परिसरात पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांचं ठिकाठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले मोठमोठे हार घालत तसेच जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यात आले.
यात्रेदरम्यान मिळणाऱ्या प्रेमामुळे पंकजा मुंडे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या भागाने लोकनेते मुंडे साहेबांइतकंच माझेवरही प्रेम केलं आहे. ही जनतेची सेवा आणि शक्ती वाढविण्याकडे समर्पित भावनेनं काम करण्याची शक्ती दे, हीच ईश्वराकडे प्रार्थना करते, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.