जामखेड न्युज——
जिल्हा परिषद केंद्र शाळा साकत येथे दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा
जिल्हा परिषद केंद्र शाळा साकत येथे सहशालेय उपक्रमा अंतर्गत दहीहंडी उत्सव चिमुकले विद्यार्थी, पालक व शिक्षक तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरीक व ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश वराट, उपाध्यक्ष व सदस्य हे उपस्थित होते.
अनेक माता पालकांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला. वाद्यांच्या तालात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. दहीहंडीच्या काल्याचा प्रसाद म्हणून विद्यार्थ्यांना लापशी भात, मुरमुरे यांचे वाटप करण्यात आले.
अँग्रीकल्चर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी वाटप करण्याचे काम केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता तसेच पालकही खूप आनंदी झाले. त्यांनी विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
दहीहंडी उत्सवासाठी मुख्याध्यापक वैजिनाथ गिते,
आशा वराट मँडम, शिवाजी मिसाळ सर, संध्या खंडागळे मँडम, सुप्रिया निगुडे मँडम व विजय जेधे सर यांनी कष्ट घेतले.