आरोळे कोविड सेंटरच्या समन्वयक व कोरोना योद्धे सुलताना शेख यांनी कोरोना रूग्णांना केक भरवून वाढदिवस साजरा

0
160
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
मागील वर्षभरापासून कोरोना रूग्णांची विनामूल्य सेवा करणा-या आरोळे कोविड सेंटरच्या समन्वयक व कोरोना योध्दे  सुलताना (भाभी) शेख यांनी आपला वाढदिवस कोरोना समवेत साजरा करून त्यांना केक भरवला. यावेळी कोरोना रूग्णांनी सुलताना भाभी करत असलेल्या सेवेमुळे आमचा कोरोना विरूद्ध लढण्यासाठी बळ मिळत असल्याचे सांगितले.
      आरोळे हॉस्पिटलच्या समन्वयक श्रीमती सुलताना भाभी यांचे शिक्षण जेमतेम असले तरी पतीच्या निधनानंतर आरोळे हॉस्पिटलमध्ये काम करण्यास सुरुवात केली हॉस्पिटल ट्रस्टच्या विश्वास संपादन केला. मागील अनेक वर्षांपासून त्या हॉस्पिटलच्या समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. मागील वर्षी डॉ. आरोळे हॉस्पिटलने विनामूल्य कोविड सेंटर चालू केले.
       डॉ. शोभा व रवी आरोळे यांनी कोविड रूग्णावर मोफत उपचार चालू केले या प्रक्रियेत सुलताना भाभी शेख यांनी रुग्ण व नातेवाईक अशा हजारो लोकांच्या स्वयंपाकाची जबाबदारी आजतागायत पार पाडली तसेच इतर वेळी रूग्णाजवळ जाऊन त्यांची विचारपूस करून औषधोपचार तसेच कोणाला काय हवे हे सर्व सव्वा वर्षापासून विनाशुल्क सेवा करीत आहेत त्यामुळे अनेक रूग्ण व त्यांचे नातेवाईक दवाखान्यात आले की सुलताना भाभीची भेट घेऊन आपल्या अडचणी सांगत आहेत. कोणतेही चिडचिड न करता त्या शांतपणे सर्वांचे म्हणने ऐकून सेवा देत आहेत.
           अशा या सुलताना भाभी यांनी आपल्या वाढदिवसाचा ढामडौल न दाखवता कोरोना रूग्णांसमवेत केक कापून व सर्व कोरोना रूग्णांना केकचे वाटप करुन साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला. एका महिलेने रुग्ण सेवेमुळे आपल्या आयुष्यात बदल घडवून कोरोना रूग्णांची माय तर कधी देवदूत म्हणून काम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here