विविध सामाजिक उपक्रम राबवून प्रा. लक्ष्मण ढेपे सरांनी केला आपला वाढदिवस साजरा

0
149

जामखेड प्रतिनिधी

           जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
 लक्ष्मण ढेपे (सर) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटर मधील रूग्णांना सुरूची भोजन तसेच आयुर्वेदिक पाणी वाटप करण्यात आले. महारुळी- गुरेवाडी ग्रामपंचायततर्फे आमदार निलेश लंके यांच्या भाळवणी येथिल शरदचंद्र पवार साहेब कोविड सेंटरला पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली अशा प्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस वाढदिवस साजरा करण्यात आला.
      विविध सामाजिक कार्यात ढेपे सर हे नेहमीच आघाडीवर असतात, मागिल कोरोना काळात अनेक गोरगरीब कुटुंबाला किराणा किटचे वाटप केले होते. तसेच या वर्षीही कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटरला आर्थिक मदत केली तसेच अनेकांना मदतीसाठी आवाहन केले यामुळे मोठय़ा प्रमाणावर मदत गोळा झाली. तसेच आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले तसेच मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण केले.
     एक जून हा प्रा. लक्ष्मण ढेपे यांचा वाढदिवस यानिमित्ताने महारुळी – गुरेवाडी ग्रामपंचायततर्फे पारनेर तालुक्यातील भाळवणी येथिल आमदार निलेशजी लंके संचलित शरदचंद्रजी पवार साहेब कोविड सेंटरला पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, नगरसेवक अमित जाधव, प्रा. लक्ष्मण ढेपे उपस्थित होते.
    आरोळे कोविड सेंटरला सुरूची भोजन देण्यात आले यावेळी प्रा. लक्ष्मण ढेपे, सुलताना (भाभी) शेख, असिफ पठाण उपस्थित होते.
   आयुर्वेदिक पाणी बाॅटलचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ. रवी आरोळे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, प्रा. लक्ष्मण ढेपे  यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
       उद्या सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयुर्वेदिक पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस आपला वाढदिवस साजरा करण्यात आला. अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवून प्रा. लक्ष्मण ढेपे सरांनी आपला वाढदिवस साजरा केला यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here