जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
मोहा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या रेडेवाडी, हापटेवाडी, नाणेवाडी येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण कॅम्प आयोजित करून सर्व नागरिकांचे लसीकरण करावे अशी मागणी मोहा ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे केली आहे.
तहसिलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच शिवाजी (काका) डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य भीमराव कापसे, विकास सांगळे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, मोहा ग्रामपंचायत अंतर्गत रेडेवाडी, हापटेवाडी, नाणेवाडी येथे कोविड- १९ चा प्रादुर्भाव वाढत आहे. मोहा ग्रामपंचायत अंतर्गत २६८१ एवढी लोकसंख्या आहे. सदर ग्रामपंचायतमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण कॅम्प आयोजित करून लसीकरण करावे अशी मागणी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तरी लवकरात लवकर लसीकरण कॅम्प आयोजित करावेत अशी मागणी केली आहे.