सुनंदाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बावी ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे वृक्षारोपण

0
209
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट ) – 
   आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री व बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा सामाजिक कार्यकर्त्यां सुनंदाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बावी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोरील अंगणात जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले वडाची झाले लावली यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
     यावेळी सरपंच निलेश पवार, उपसरपंच दादा मंडलिक, चेरमन दादासाहेब पवार, राहुल कवादे, वाल्मिक पवार, योगेश पवार, रवी शिंदे, इमाम पठाण, अशोक शिंदे, शुभम पवार, रामकृष्ण पवार , प्रेमराज मावाणी, भागवत पवार सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
     आमदार रोहित हे विधानसभेत दिसत असले तरी त्यांचे अवघं कुटुंबच मतदारसंघाच्या विकासकामांत रमलं आहे. विशेषतः त्यांच्या आईसाहेब म्हणजेच सुनंदाताई यांचे बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष आहे.मतदारसंघात पाणलोटविकास असेल नाही तर महिला सक्षमीकरण यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आता त्यांनी कर्जत-जामखेडच्या सुंदरतेकडे लक्ष वेधले आहे.आपलं शहर स्वच्छ व सुंदर व्हावं आपल आरोग्य चांगल राहवं  याकरिता ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’ च्या निमित्ताने  कर्जत-जामखेड ही दोन्ही शहरे दुर्गंधीच्या विळख्यातून मुक्त होऊन अव्वल स्थानी यावेत याकरिता आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री, अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत पाठोपाठ जामखेड शहरातही कामाला सुरूवात केली आहे.
येथील प्रभागनिहाय बैठका घेतल्या या अभियानात विविध संघटना, व्यापारी, डॉक्टर संघटना व अन्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी एकत्र येऊन आपले योगदान द्यावे,” असे आवाहन सुनंदाताई पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जामखेड येथे केले. दरम्यान, आमदार पवार हे जामखेड व कर्जत या दोन्ही तालुक्यांमध्ये महत्वकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे वडील अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार हे दोन्ही तालुक्यातील शेतीची उत्पादकता वाढावी व शेतकऱ्यांना अधिकचे आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता प्रयत्न करीत आहेत.
   सुनंदाताई पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बावी ग्रामपंचायतीने गावात वृक्षारोपण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here