जामखेड न्यायालयाच्या आवारातच खर्ड्याच्या सरपंच पतीस मारहाण परिसरात एकच खळबळ

0
363

जामखेड न्युज——

जामखेड न्यायालयाच्या आवारातच खर्ड्याच्या सरपंच पतीस मारहाण परिसरात एकच खळबळ

मागील अडिच वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या गुन्ह्यातील दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले होते. यासाठी फिर्यादी या गुन्ह्यातील साक्ष देण्यासाठी आले असता यातील आरोपींनी फिर्यादीजवळ येऊन तु आमच्या विरोधात साक्ष देतो काय असे म्हणत. फिर्यादीस जामखेड न्यायालयाच्या आवारातच लोखंडी टामीने मारहाण करून जखमी केले. जामखेड न्यायालयाच्या आवारातच मारहाणीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आरोपी बबन नरहरी मदने व निवास उर्फ (भाऊ) बबन मदने या दोन बाप लेकांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, यातील फिर्यादी वैजीनाथ पोपटराव पाटील व आरोपी बबन नरहरी मदने हे दोघे एकाच गावातील असून या दोघांचे सन २०२० मध्ये भांडण झाले होते. त्यावेळी फिर्यादी वैजीनाथ पाटील यास मारहाण केली होती. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला आरोपी बबन नरहरी मदने व त्याचे दोन मुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल होता. याबाबत गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन गुन्ह्याचे दोषारोप पत्र जामखेड न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणी फिर्यादीची आज २४ आँगस्ट रोजी सकाळी साक्ष असल्यामुळे जामखेड न्यायालयात हजर झाले होते. यावेळी फिर्यादी व त्याचा मित्र कृष्णा सोपान भुते बोलत होते. यावेळी आरोपी बबन नरहरी मदने व त्याचा मुलगा श्रनिवास उर्फ भाऊ बबन मदने दोघे रा. खर्डा ता. जामखेड हे आले व फिर्यादीस म्हणाले की, तु कोर्टात आमच्या विरोधात साक्ष देतो काय? असे म्हणत दोघांनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण करत बबन नरहरी मदने याने हातातील लोखंडी टामीने कपाळावर मारहाण करत जखमी केले व सोबत असणारा श्रीनिवास बबन मदने याने गळा दाबून जीवे ठार मारण्यात प्रयत्न केला. व तु आमच्या विरोधात न्यायालयात साक्ष दिली तर बघून घेऊ असे म्हणाले.

यावेळी फिर्यादीच्या ओळखीचे असणारे श्रीराम जायभाय, भास्कर जायभाय, कृषा सोपान भुते, नितीन सुरवसे व मनोज पाटील यांनी सदरचे भांडण सोडवले. वरील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती यांच्या कडे आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

चौकट

फिर्यादी वैजीनाथ पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत तसेच त्यांची पत्नी या खर्ड्याच्या सरपंच आहेत. ही सर्व घटना न्यायालयाच्या आवारातच घडल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

 चौकट

न्यायालयास न्यायदेवता म्हटले जाते. न्यायसंस्था लोकशाहीचा एक स्तंभ आहे. त्यामुळे लोकांनी न्यायालयात गेल्यावर कायद्याचे भान राखणे आवश्यक आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here